शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींची भूमिका स्पष्ट व्हायला हवी, श्रीमंत शाहू छत्रपतींचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 12:50 IST

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात मूक आंदोलन करण्यात आलं.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात मूक आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्यातील अनेक नेते, आमदार आणि खासदारांनी आंदोलनाला उपस्थिती लावली. आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी हे मूक आंदोलन करण्यात आलं. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती यांनी उपस्थितांना संबोधित करताना मराठा आरक्षणासाठी दिल्लीत आवाज बुलंद करण्याची गरज व्यक्त केली. 

"मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ती आपल्याला समजायला हवी. त्यांच्यापर्यंत आपला मुद्दा पटवून द्यायला हवा. दिल्लीत भाजप आज बहुमतात आहे. पंतप्रधानपदी तिथं नरेंद्र मोदी बसलेत त्यांच्यापर्यंत आपला बुलंद आवाज पोहोचायला हवा. आपण बलाढ्या आहोत असं समजून दिल्लीत आवाज पोहोचला पाहिजे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊनच दिल्लीत पाठपुरावा करायला हवा. समिती वैगेरे सगळं नाममात्र असतात पंतप्रधानांनी जर ठरवलं तर ते सगळं करू शकतात", असं श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले आहेत. 

कोल्हापूरात झालेल्या या मूक आंदोलनात यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. 

कुणाच्या आरक्षणावर गदा आणून मराठा समाजाला आरक्षण नको"मराठा समाज कोणकोणत्या ठिकाणी मागास आहे, हे पाहिलं पाहिजे, केवळ याचिका दाखल करून उपयोग नाही. यासाठी सर्व खासदार, आमदार, समाज यांनी एकत्र यावं. आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल, नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही", असं सांगतानाच श्रीमंत शाहू छत्रपती यांनी इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणावर गदा आणून मराठा समाजाला आरक्षण नकोय. मराठा समाजासाठी स्वतंत्रच आरक्षण मिळायला हवं, मार्ग खूप खडतर आहे. पण अशक्य नाही. फक्त यासाठी सर्वांनी एकत्र यावं, असं शाहू छत्रपती म्हणाले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीBJPभाजपा