शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मराठा आरक्षणावरून विधान परिषदेत जोरदार राडा, मार्शल बोलवले, सभागृह तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 15:07 IST

Vidhan Parishad : सत्ताधारी आणि विरोधक वेलमध्ये जमा झाले. जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.

मुंबई : मंगळवारी मुंबईत मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) चर्चा करण्यासाठी सरकाने सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दांडी मारली होती. यावरून आज सभागृहात कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विधान परिषदेत जोरदार राडा झाला. 

भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. पण, या बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली. या बैठकीला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहाणे गरजेचे होते. पण ते आले नाहीत असा मुद्दा प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला. त्यानंतर विधान परिषदेत एकच गोंधळ उडाला.

सत्ताधारी आणि विरोधक वेलमध्ये जमा झाले. जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. त्यातच उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करत होत्या. पण गदारोळ कमी झाला नाही.  या गदारोळात चर्चा कशी करणार असे त्या म्हणत होत्या. आधी शांत व्हा मग बोलण्याची परवानगी देते पण कोणीही ऐकण्याचे तयारीत नव्हते. शेवटी मार्शलला बोलवा असे आदेशही निलम गोऱ्हे यांनी दिले. पण, गदारोळ थांबला नाही. शेवटी सभापती निलम गोऱ्हे यांना विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. 

दुसरीकडे, विधानसभेतही मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. कालच्या मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकीला विरोधकांनी दांडी मारल्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आमदारांनीच सभागृहात विरोधकांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. तसेच, भाजपचे आमदार अमित साटम आणि आशिष शेलार यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांना धारेवर धरले. 

विधान परिषदेत काय म्हणाले प्रविण दरेकर? मराठा आरक्षणावरून राज्यात जातीय तेढ निर्माण होत आहे. यावर काही तरी तोडगा निघाला पाहीजे अशी मागणी होत होती. त्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी सरकारने एक सर्व पक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी केली. त्याला सरकारने सकारात्मक प्रतिसादही दिला. त्यानुसार सह्याद्री अतिथी गृहात सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. पण या बैठकीकडे राज्याचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवली. त्यमुळे त्यांचे आरक्षणा बाबतचे पुतना मावशीचे प्रेम सर्वांना दिसून आले. ते सर्व जण एक्सपोज झाले असा हल्लाबोल प्रविण दरेकर यांनी केला. 

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदMaharashtraमहाराष्ट्रNeelam gorheनीलम गो-हेPoliticsराजकारण