शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांत यंदा मराठा आरक्षण नाहीच, राज्याचे अपील सुप्रीम कोर्टाने फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 07:01 IST

मराठा व अन्य समाजांना शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणाच्या आधारे (एसईबीसी) १६ टक्के आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा लागू होण्याआधी सुरू झालेल्या वैद्यकीय व दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशांना लागू करता येणार नाही

नवी दिल्ली/नागपूर : मराठा व अन्य समाजांना शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणाच्या आधारे (एसईबीसी) १६ टक्के आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा लागू होण्याआधी सुरू झालेल्या वैद्यकीय व दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशांना लागू करता येणार नाही, या मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याने यंदा हे प्रवेश मराठा आरक्षणाविनाच होतील.डॉ. संजना वाडेवाले यांच्यासह १३ जणांच्या याचिकेवर न्या. सुनील शुकेर व न्या. पुष्पा गनेडीवाला यांच्या खंडपीठाने २ मे रोजी वरील निकाल दिला होता. त्याविरुद्ध राज्य सरकार व इतरांनी विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात केल्या होत्या. न्या. एल. नागेश्वर राव व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने पहिल्या सुनावणीलाच त्या फेटाळल्या. ‘एसईबीसी’ आरक्षण कायद्याच्या कलम १६(२) मध्ये आधी सुरू झालेल्या प्रवेशांना तो लागू नाही, अशी तरतूद असल्याने हायकोर्टाच्या निकालात काही गैर नाही, असे न्यायालयाने म्हटले.राज्य सरकारचे अ‍ॅड. मुकुल रोहटगी यांनी हायकोर्टाच्या निकालास स्थगिती मागताना सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांना ‘एसईबीसी’ कोट्यातून प्रवेश मिळणार होते त्यांना अखिल भारतीय कोट्यातूनही प्रवेश मिळाले होते. ते सोडून ते राज्य कोट्यात आले. त्यामुळे आरक्षण लागू केले नाही तर त्यांचे नुकसान होईल.मूळ याचिकाकर्त्यांचे अ‍ॅड. ध्रुव मेहता म्हणाले की, आधी सुरू झालेल्या प्रवेशांना मराठा आरक्षण लागू केले तर एरवी ज्यांना दर्जेदार कॉलेजांमध्ये प्रवेश मिळू शकणारे विद्यार्थी मागे पडतील व त्यांना जादा फी भरून अन्य कॉलेजांत प्रवेश घ्यावे लागतील.हायकोर्टाच्या निर्देशानुसार नव्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य सरकारने ३१ मेपर्यंत वेळ वाढवून मागितली. सर्वोच्च न्यायालयाने २५ मेपर्यंत वेळ वाढवून दिली. आधी अंतिम फेरी १८ मे रोजी पूर्ण व्हायची होती. आता ती २५ मे रोजी पूर्ण करावी लागेल.एसईबीसी प्रवर्गातून दिलेले सर्व प्रवेश होणार रद्दया अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला १६ आॅक्टोबर व २ नोव्हेंबर २०१८ पासून सुरुवात झाली. एसईबीसी कायदा ३० नोव्हेंबर २०१८ पासून लागू झाला. त्यामुळे हा कायदा या अभ्यासक्रमांतील प्रवेशास लागू केला जाऊ शकत नाही. कायद्यातील कलम १६(२)मधील तरतुदीनुसार हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येत नाही,असे मूळ याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.ते मान्य करून नागपूर खंडपीठाने म्हटले होते की, एसईबीसी कायदा लागू झाल्याच्या तारखेपूर्वी (३० नोव्हेंबर २०१८ पूर्वी) प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमांतील जागा एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही विरोधात गेल्यामुळे राज्य सीईटी सेलला एसईबीसी प्रवर्गातून दिलेले सर्व प्रवेश रद्द करावे लागतील.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय