शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगेंची पदयात्रा मुंबईच्या वेशीवर, नवी मुंबईत मराठ्यांचे भगवे वादळ दाखल, आजचा दिवस निर्णायक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 08:06 IST

सध्या मनोज जरांगे पाटील हे वाशी मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत पोहचले असून त्यांच्या सोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत.

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण पदयात्रा नवी मुंबईत दाखल झाली असून सकाळी दहाच्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. 

सध्या मनोज जरांगे पाटील हे वाशी मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत पोहचले असून त्यांच्या सोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत. माथाडी भवन चौकातील सभेच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी रात्री एक वाजताही हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणी ढोल हलगीच्या तालावर अनेकांनी ठेका धरला होता.  भगवे झेंडे फडकावत व घोषणा देत एकमेकांचा उत्साह वाढविला जात होता. मनोज जरांगे पाटील यांचे सकाळी 5.30  वाजता आगमन झाले. वाशी येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे.  

याचबरोबर, आज मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाचा निर्णायक दिवस मानला जात आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून जोरदारपणे प्रयत्न सुरु आहे. माथाडी भवनमध्ये त्यांची सरकारच्या शिष्टमंडळाशी भेट होण्याची शक्यता आहे. तसेच, सकाळी बाजार समितीमध्ये ध्वजवंदन झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील सभेला संबोधित करण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाकारत खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर आंदोलन करावे, हा मुंबई पोलिसांचा प्रस्ताव मनोज जरांगे पाटील यांनी धुडकावला आहे. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आंदोलनाबाबत नोटीस दिली असली, तरी आम्ही हौस म्हणून मुंबईला निघालेलो नाही, आता आरक्षण घेऊनच माघारी फिरणार असा निर्धार जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

निवासाच्या ठिकाणी आरोग्य सुविधा मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनासाठी लाखोंच्या संख्येने मुंबईत येणाऱ्या आंदोलकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी नवी मुंबईतील सकल मराठा समाजासह विविध संस्थानी देखील पुढाकार घेतला. नेरुळमधील तेरणा शाळा आणी वैद्यकीय महाविद्यालयात नवी मुंबई सकल मराठा समाजाच्या वतीने 15 हजार आंदोलकांची राहण्याची आणी जेवणाची सोय करण्यात आली. तेरणा व्यवस्थापनाच्या वतीने वैद्यकीय महाविद्यालय, शाळेची इमारत, मैदान आंदोलकांना वापरण्यासाठी दिले असून तेरणा रुग्णालयाच्या वतीने मोफत आरोग्य कॅम्प आणी रुग्णवाहीका उपलब्ध करून दिल्या.

एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी दुमदुमली नवी मुंबई राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा आंदोलन नवी मुंबईत दाखल झाले आहेत. मध्यरात्री बारानंतरही ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो, दुचाकीवरून आंदोलक बाजार समितीत दाखल होत होते. एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी संपूर्ण नवी मुंबई परिसर दुमदुमला होता. पामबीच रोडवर नेरूळ, सारसो॓ळे, सानपाडा चौकात नवी मुंबईतील शेकडो नागरिकांनी आंदोलकांचे स्वागत केले. रोडवर ठिकठिकाणी माहिती देण्यासाठी स्वयंसेवक तैनात होते. एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण