शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा आंदोलकांनी उपोषण १५ दिवसांनंतर घेतले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 06:09 IST

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती महामोर्चाचे १५ दिवसांपासून आझाद मैदानात सुरू असलेले उपोषण शनिवारी मागे घेण्यात आले.

- विश्वास पाटीलमुंबई/कोल्हापूर : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती महामोर्चाचे १५ दिवसांपासून आझाद मैदानात सुरू असलेले उपोषण शनिवारी मागे घेण्यात आले. दरम्यान, मराठा आरक्षणासंबंधी नियुक्त केलेल्या न्या.गायकवाड आयोगाने मराठा समाजाला किती आरक्षण द्यावे, याची शिफारस केली नसल्याची माहिती आयोगाच्या सूत्रांनीदिली.सरकारने आयोगाला जी कक्षा ठरवून दिली होती, त्यामध्ये अशी शिफारस करण्याची तरतूद नव्हती, असे समजते. मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण सिद्ध होत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. हा समाज ३० टक्के असल्याचे आयोग म्हणतो.आयोगाकडे आलेल्या पुराव्यांवरून मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध झाले आहे. त्यासाठी आयोगाने छत्रपती शिवाजी महाराज ते आतापर्यंतच्या काळाचा अभ्यास केला. मराठा समाजाने आरक्षणाची मागणी सुरू झाल्यावर, नेमलेल्या खत्री आयोगाने मराठा कुणबी, कुणबी मराठा यांचे मागासलेपण मान्य केले होते, परंतु सर्व मराठा समाजास त्यांनी मागास म्हटले नव्हते.बापट आयोगाने मराठा समाज मागास नाही, त्यामुळे आरक्षणाची शिफारस करत नाही, असे म्हटले होते. ते अहवाल त्रोटक व अपुऱ्या माहितीवर आधारित होते. याउलट गायकवाड आयोगाने तळागाळापर्यंत जाऊन पुराव्यांचे संशोधन केले. वर्षभर हे काम सुरू होते.राज्य सरकारनेच निर्णय घ्यावाअसामान्य व अपवादात्मक परिस्थिती असेल, तर ५० टक्क्यांहून जास्त आरक्षण देण्याची तरतूद आहे. गायकवाड आयोगाने हा समाज ‘बॅकवर्ड क्लास’ असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्याला किती टक्के आरक्षण द्यायचे, हे सरकारने ठरवावे, असेही अहवालात म्हटले आहे.... तर पुन्हा आंदोलन : जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून मुंबईतील उपोषण संपविले. मात्र, १० दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण