शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे पाटलांनी मुंबईचं आंदोलन स्थगित करावं; पुरुषोत्तम खेडेकर काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 19:20 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मनोज जरांगे पाटलांची मागणी संविधानिक आहे असं त्यांनी सांगितले.

हिंगोली - मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला वेळ द्यावा, संवाद साधावा आणि मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटलांना विश्वास द्यावा जे काही खरे असेल ते सांगावे. २० तारखेपासून जे काही चलो मुंबई आंदोलन करताय ते स्थगित करावे अथवा पुढे ढकलावे असा सल्ला मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिला आहे. 

पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मनोज जरांगे पाटलांची मागणी संविधानिक आहे. आंदोलनात काही भावनिक प्रकार होतायेत. राज्य सरकारलाही काही मर्यादा असतात. राज्य सरकार कुटुंब किंवा व्यक्तीसारखं काम करत नाही. एकनाथ शिंदेंवर त्यांनी विश्वास ठेवला आहे. मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतील असं त्यांना वाटतंय. त्यामुळे त्यांनी वेळ दिला पाहिजे. मराठवाड्यातील आणि अन्य राज्यातील जिल्ह्यात ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्या सापडल्या आहेत. सरसकट मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा हे राज्य सरकारच्या अख्यारित्य येत नाही. तर राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सल्ल्यानुसार त्यांना तो निर्णय घ्यावा लागेल असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत  गेल्या ३५ वर्षापासून मराठा सेवा संघ कार्यरत आहे. मात्र अलीकडे तरुण आणि महिलांचा सहभाग आणि सक्रीय काम दिसत नाही. चळवळीत शिथिलता आलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांशी संपर्क साधावा. चर्चा करावी. तरुण आणि महिलांशी बोलावं. सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयावर चर्चा केली जाईल. काम करणाऱ्या लोकांची समर्पिक भावना कमी झालीय. आता नवीन पिढीने संघटनेत कार्यरत व्हावे. आमची काय चूक हे शोधून मार्ग काढू असं सांगत खेडेकर यांनी राज्यभरात संवाद दौरा करणार असल्याचे घोषित केले. 

संभाजी ब्रिगेडला ठाकरेंकडून हव्या २ जागा

संभाजी ब्रिगेड आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय युती झाली आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली आहे. संभाजी ब्रिगेडच्या वाट्याला काही जागा याव्यात अशी मागणी आम्ही केली आहे. आम्ही थेट महाविकास आघाडीचे घटक नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्याला ज्या जागा मिळतील त्यातील काही जागा आम्हाला द्याव्यात ही चर्चा करण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतली. किमान हिंगोली, बुलढाणा या दोन लोकसभा जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी आम्ही केली आहे. त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. चर्चा सकारात्मक झाली आहे. हिंगोलीत आमचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे निवडणूक लढवतील. तशी आम्ही त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. बुलढाणा जागेबाबत अद्याप निर्णय झाला नाही अशी माहितीही पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरे