शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
3
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
4
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
5
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
6
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
7
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
8
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
9
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
10
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
11
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
12
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
13
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
14
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
15
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
16
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
18
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
19
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
20
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा, वस्तुस्थितीत रूपांतर नाही - उदयनराजे भोसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 17:13 IST

Udayanraje Bhosale : सोमवारी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे. 

मुंबई : मराठा आरक्षणाची मागणी आता पुन्हा जोर धरु लागली आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाने आता सरकारला थेट ९ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मराठा आरक्षणाशिवाय निवडणुकांचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडू असाही इशारा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे. 

सोमवारी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "विकास कामांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसेच, मराठा आरक्षणाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यासंदर्भात फक्त घोषणा होत असतात, पण वस्तुस्थितीत रूपांतर होत नाही. सगळ्यांना आशा आहे की, शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळेल. कुठल्याही समाजाच्या लोकांवर अन्याय न होता, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे." 

दुसरीकडे, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भेटीचा संबंध मंत्रिमंडळ विस्ताराशी लावला जात आहे. उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद हवे आहे का? अशा चर्चांनाही उधाण आले आहे.

उद्या शपथविधी होणारउद्या सकाळी ११ वाजता राजभवन येथे शपथविधी होणार आहे. शिंदे गटातील ६ ते ७ आमदार उद्या शपथ घेतील, अशी शक्यता आहे. तर भाजपाचे ११ जण उद्या मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता राज्याच्या मंत्रिमंडळात असावा, अशी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबितगेल्या वर्षानुवर्षापासून मराठा आरक्षणाचा घोंगड हे भिजत पडलेले आहे. त्यासाठी राज्यभरात आंदोलने झाली आहेत. छत्रपती संभाजी राजे यांनीही त्यासाठी राज्यभर दौरे करत मराठा समाजाच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. मुंबई ते दिल्ली अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. तसेच कोर्टातील लढाई लढली गेली आहे. मात्र तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न हा निकालात निघू शकलेला नाही.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे