शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आजपासून उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 06:56 IST

मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणाची हाक देण्यात आली आहे.

मुंबई : मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणाची हाक देण्यात आली आहे. या वेळी काळ्या फिती, झेंडे लावून मराठा समाजातर्फे सरकारचा निषेध केला जाईल.समन्वयक निशांत सकपाळ म्हणाले, आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना १५ नोव्हेंबरपर्यंतची वेळ दिली आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंददरम्यान ज्या तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्याची प्रमुख मागणी या वेळी केली जाईल. शिवाय सारथी संस्था, मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृह व अन्य महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली जाईल. आंदोलनादरम्यान तरुण-तरुणींनी आत्महत्या केल्याने यंदा काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध करण्यात येईल.दिवाळी पाडव्याला नवा पक्ष सकल मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा या दोन्ही गटांनी ‘मराठा क्रांती मोर्चा’ नावाने राजकीय पक्ष स्थापण्यास विरोध केला आहे. तरीही मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या नावाखाली नव्या पक्षाच्या कार्यकारिणीची पहिली बैठक नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी दुपारी पार पडली. या वेळी मराठा समाजाच्या नवीन राजकीय पक्षाची स्थापना दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ८ नोव्हेंबरला रायरेश्वर येथे करणार असल्याचे समितीने स्पष्ट केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा