शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

मराठा आरक्षण : अहवालाची परिशिष्टे पेन ड्राइव्हमधून देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 7:16 AM

मराठा आरक्षणासंबंधी मागास प्रवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालाची परिशिष्टे पेन ड्राइव्हद्वारे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सोमवारी सादर केली.

मुंबई - मराठा आरक्षणासंबंधी मागास प्रवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालाची परिशिष्टे पेन ड्राइव्हद्वारे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सोमवारी सादर केली. तसेच सर्व याचिकाकर्त्यांना व प्रतिवाद्यांना सरकारी वकिलांच्या कार्यालयातून पेन ड्राइव्हद्वारे परिशिष्टे मिळू शकतात, असे राज्य सरकारने या वेळी स्पष्ट केले.मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने सर्व याचिकाकर्त्यांना व प्रतिवाद्यांना मागासवर्ग आयोगाचा अहवाल उपलब्ध करून दिल्यानंतर या अहवालाची परिशिष्टे उपलब्ध करून देण्यावरून गेल्या गुरुवारी उच्च न्यायालयात वाद निर्माण झाला. त्या वेळी न्यायालयाने सरकार याचिकाकर्त्यांना व प्रतिवाद्यांना परिशिष्टे देण्यास नाकारू शकत नाही, असे स्पष्ट केले आणि त्या कशा स्वरूपात देणार, याची माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.सोमवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी ही परिशिष्टे पेन ड्राइव्हद्वारे देऊ, असे न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाला सांगितले. सर्व याचिकाकर्त्यांनी व प्रतिवाद्यांनी सरकारी वकिलांच्या कार्यालयातून ही परिशिष्टे मिळतील, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भातील कायद्याला आव्हान देणाऱ्या जयश्री पाटील यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारने सोमवारपासून सवर्णांसाठी लागू केलेल्या १० टक्के आरक्षणाला विरोध करत याच याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्यांना मुभा देत याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण