मराठा आरक्षण संघर्ष कृती समितीच्या संस्थापकावर जीवघेणा हल्ला
By Admin | Updated: May 9, 2017 14:27 IST2017-05-09T14:27:36+5:302017-05-09T14:27:36+5:30
महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण संघर्ष कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ गायकवाड यांच्यावर मंगळवारी अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे.

मराठा आरक्षण संघर्ष कृती समितीच्या संस्थापकावर जीवघेणा हल्ला
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 9 - महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण संघर्ष कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ गायकवाड यांच्यावर मंगळवारी अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे.
दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील टाकळी गावच्या शिवारातील ही घटना आहे. पंढरपूर शहरात मागील काही दिवसांपासून वाळू व पैशाच्या कारणावरून सातत्याने एकमेकांवर खूनी हल्ले होत आहेत.
गायकवाड यांच्यावरही वाळू व्यवसायातूनच हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून हल्लेखोराच्या तपासासाठी ग्रामीण पोलिसांचे पथके रवाना करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. यानंतर गायकवाड यांना तत्काळ उपचारासाठी पजिल्हा रुगाणालयात दाखल करण्यात आले आहे.