शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण विधेयक, एटीआर आजच विधिमंडळात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 08:20 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक आणि मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील सरकारचा कृती अहवाल आज विधीमंडळात मांडण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देमराठा आरक्षणाचे विधेयक, एटीआर आजच विधामंडळात !दोन दिवसांत आरक्षण द्या, नाहीतर तुमचा निकाल लावू!आरक्षणाचा निर्णय राज्य यादीत असल्याने त्यास राष्ट्रपतींच्या मंजुरीची गरज भासणार नाही.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक आणि मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील सरकारचा कृती अहवाल आज विधिमंडळात मांडण्यात येणार आहे. 

मराठा समाजाला किती आणि कसे आरक्षण द्यायचे, यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उपसमितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या विधेयकासंबंधीचा मसुदा निश्चित करण्यात आला. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचे या बैठकीत ठरल्याचे समजते. 

दरम्यान, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यानंतर विधेयक मांडून संमत केल्यानंतर राज्यपालांची मंजुरी घेण्यात येईल. तसेच, आरक्षणाचा निर्णय राज्य यादीत असल्याने त्यास राष्ट्रपतींच्या मंजुरीची गरज भासणार नाही. राज्यपालांच्या मंजुरीनंतर यासंबंधीची अधिसूचना 5 ते 10 डिसेंबर या कालावधीत निघेल, अशी शक्यता आहे.

दोन दिवसांत आरक्षण द्या, नाहीतर तुमचा निकाल लावू!मराठा क्रांती मूक मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले की, ३० नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत टिकेल असे आरक्षण सरकारला द्यावे लागेल. तोपर्यंत संवाद यात्रेच्या रूपात आलेले कार्यकर्ते आझाद मैदानात ठिय्या देणार आहेत. मात्र, सरकारने वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन समाजाच्या हाती जाईल. त्यानंतर, समाजच सरकारचा निकाल लावेल, असा इशारा पवार यांनी दिला आहे. 

मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिली गुरुवारची डेडलाइनगेल्या ९ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आंदोलनाची दखल घेण्यासाठी शासनाचा एकही प्रतिनिधी आला नसल्याचा रोष मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनात आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप मदत मिळाली नसल्याची खंत समन्वयकांनी व्यक्त केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणVidhan Bhavanविधान भवनvidhan sabhaविधानसभाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा