शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

'९ ऑगस्टच्या आंदोलनात सामील व्हा, अन्यथा काळं फासू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 21:27 IST

मराठा क्रांती मोर्चाचा समाजातील लोकप्रतिनिधींना इशारा

लातूर : 9 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा, अन्यथा तोंडाला काळं फासू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं समाजातील आमदार, खासदारांना देण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून आज ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना इशारा देण्यात आला आहे. लातूरमध्ये सलग चौथ्या दिवशी मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सकाळी पावणे अकराच्या सुमारास जोरदार घोषणा देत घंटानाद करीत आंदोलनास सुरूवात झाली. तत्पूर्वी सुमित सावळसुरे व नवनाथ माने यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार विक्रम काळे हे उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांनी त्यांचा निषेध केला. आरक्षणासाठी तरुण आत्महत्या करत आहेत. मात्र तरीही मराठा समाजातील लोकप्रतिनिधी गप्प आहेत. आरक्षण मिळवून देण्यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती त्यांच्याकडे नाही. हे आंदोलन त्यांचं नाही का ? असा सवालही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. क्रांती दिनी होणारं आंदोलन शासनाच्या उरात धडकी भरवणारं करण्याचा व त्यासाठी गावागावात, वाड्या-वस्त्यांत संदेश पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. आमदार विक्रम काळे यांचे वडिल दिवंगत वसंतराव काळे यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी शेतकरी व ग्रामविकासात दिलेल्या योगदानाचा उल्लेख आंदोलनाकर्त्यांकडून करण्यात आला. आमदार काळे यांनी वडिलांचा हा वारसा पुढे न्यावा, असा सल्लाही आंदोलनकर्त्यांनी दिला. ही लढाई आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणlaturलातूर