शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; पुणे जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालून राज्य सरकारचा निषेध नोंदवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 18:39 IST

राज्य सरकारविरुद्ध मराठा समाजात तीव्र नाराजी व प्रचंड असंतोष

ठळक मुद्देमराठा क्रांती मोर्चाची पुण्यात बैठक

पुणे : मराठा समाजाचा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. वेळोवेळी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने अन्याय झाल्याची भावना मराठा न समाजात असून  राज्य सरकार विरुद्ध मोठी नाराजी आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी ( दि १७) पुणे जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालुन राज्य सरकारचा निषेध नोंदवणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मराठा क्रांती मोर्चा ठरल्याप्रमाणे पुणे जिल्ह्याची मराठा आरक्षण स्थगितीबाबत निर्णय बैठक पुण्यातील कृष्णसुंदर गार्डन आयोजित करण्यात आली होती. कोरोनाचे सावट असल्याकारणाने ही बैठक मराठा क्रांती मोर्चाच्या मुख्य ५० समन्वयकांच्या उपस्थितीत होते. तसेच झूम वेब द्वारे अनेक कार्यकर्ते या बैठकीत सहभागी झाले होते.

राजेंद्र कोंढरे म्हणाले,मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे समाज प्रचंड अस्वस्थता पसरली असून ठिकठिकाणी बैठका सुरु आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अध्यादेश न काढता स्थगिती उठविण्यासाठी न्यायाधीशांकडे विनंती अर्ज करावा.त्याचप्रमाणे लाखोंच्या संख्येने काढण्यात आलेल्या मोर्चाच्यावेळी मराठा समाजातील तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे देखील तात्काळ मागे घेण्यात या आमच्या मागण्या आहेत.  त्याच धर्तीवर जिल्हाधिकाऱ्याांना घेराव घालणार आहे. या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली नाही तर लढा अधिक आक्रमक करणार आहे.  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाअगोदर पूर्ण करण्यात आलेले विद्यार्थ्यांचे प्रवेश संरक्षित करण्यात यावे. तसेच स्थगितीनंतरच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत राज्य सरकारने तात्काळ नियोजन करावे. सारथी संस्थेबाबत प्रलंबित असणारे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत असेही राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले.

मराठा समन्वयकांमध्ये धनंजय जाधव,तुषार काकडे, बाळासाहेब अमराळे, प्रमोद अडसूळ, पूजा झोळे  व झूम मीट द्वारे राजेंद्र कुंजीर, सचिन आडेकर , श्रुतिका पाडाळे यांनी देखील यावेळी आपल्या भूमिका मांडल्या.

टॅग्स :PuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाState Governmentराज्य सरकारcollectorजिल्हाधिकारी