'सैराट'मुळेच मराठा समाजाचा आक्रोश- रामदास आठवले
By Admin | Updated: September 17, 2016 18:17 IST2016-09-17T18:17:14+5:302016-09-17T18:17:14+5:30
नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले पुन्हा चर्चेत आहेत. मराठा समाजाच्या आक्रोशाला सैराट चित्रपट जबाबदार

'सैराट'मुळेच मराठा समाजाचा आक्रोश- रामदास आठवले
ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई,दि.17- नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले पुन्हा चर्चेत आहेत. मराठा समाजाच्या आक्रोशाला सैराट चित्रपट जबाबदार असल्याचे आठवले म्हणाले आहेत. आठवलेंच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी हे वक्तव्य केलं.
सैराट चित्रपटात जातीच्या पलीकडे जाऊन तरूण संघटीत होत असल्याचे चित्र दाखवले आहे. मराठा समाजाच्या मनात त्याचाच राग खदखदत असल्याची टीका आठवलेंनी केली. ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी मराठा मोर्चाचा घाट घातला जात असल्याचा आरोप आठवलेंनी केला आहे.