शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मला अस्वस्थ बघून राज्यात मराठा समाजाला सहन होणार नाही - मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 11:52 IST

माझ्यावर गुन्हे दाखल करताय, तुमच्यावरही मराठे गुन्हे दाखल करणार आहेत. मराठा शांत बसला नाही. तुम्ही काय काय करताय हे बघतोय असंही जरांगे म्हणाले. 

छत्रपती संभाजीनगर - Manoj Jarange Patil ( Marathi News ) मी भोगायला, लढायला तयार आहे. जेलमधून बाहेर आलो तरी सरकारकडून आरक्षण घेणारच. बाकीच्यांना आरक्षण दिले मग मराठ्यांना आरक्षण द्या. नेते तुमच्यासोबत असतील परंतु मराठ्यांचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. कितीही नेते फुटले तरी त्यांना मराठाविरोधी ठरवलं आहे. तुमच्या नेत्याला जातीसाठी बोललोय. नेता नेता करत बरळलायला लागलंय. मी दवाखान्यात असल्याने मराठा समाज चिंतेत आहे. मला अस्वस्थ बघून मराठा समाजाला सहन होणार नाही. मी जातीवादी नाही. नेत्याचा ठेका आम्ही घेतला नाही असा निशाणा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर साधला आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, इंग्रजांनीही केली नसेल इतकी भयंकर दडपशाही, जातीय द्वेष सरकार आणि गृहमंत्री फडणवीस करतंय. सोशल मीडियात मराठा समाजाबद्दल खुन्नस दाखवली जातेय. मी मराठा समाजासाठी भांडतोय. त्यात गोरगरिब, कष्टकरी, श्रीमंत सर्वच मराठ्यांसाठी भांडलोय. मी बोललो नेत्याला पण मराठा समाजातील नेत्यांना राग आलाय. गोरगरीब मराठ्यांनी मतदान केल्याने तुम्ही नेते झालात. आज सर्व मराठा आमदारांनी जातीकडून बोलायला हवे. सरकारनं फसवणूक केली, नेत्याने विश्वासघात केला म्हणून मी बोलतोय.पण तुम्ही त्या नेत्याला बोलण्याऐवजी मला बोलताय असा आरोप जरांगेंनी केला. 

तसेच अंतरवाली सराटी इथं गावकऱ्यांवर सुरु असलेली दडपशाही बंद करा. मराठा समाजाने राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना ईमेल करून मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही थांबवा, सगेसोयरेची अंमलबजावणी करा अशी मागणी करा. कोट्यवधी ईमेल गेले पाहिजेत. आपण शांततेत सर्व करायचे. मी हटत नाही. मी घाबरत नाही. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. जेलमध्ये टाकून सरकारने मला सडवलं तरीही मागे हटणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. 

दरम्यान मला अटक केले तरी जेलमध्ये आमरण उपोषण करेन. तडफडून मरायला तयार आहे पण मागे हटायला तयार नाही. सरकार वारंवार आश्वासन देतंय पण ते पूर्ण करत नाही. सरकारने प्रमाणपत्रे वाटप करणे बंद केले आहे. जाणुनबुजून हायकोर्टाची तारीख अगोदर घेतली. शांततेत आंदोलन करूनही गुन्हे दाखल केलेत. १० टक्के आरक्षण ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी घ्यावे परंतु राज्यातील मराठा समाजाची मागणी ओबीसीतून आरक्षणाची आहे. ते घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. मराठा समाजाने चलबिचल करू नका. शांत राहून मज्जा बघा. सरकार किती दिवस दडपशाही करतंय पाहू असं त्यांनी म्हटलं. 

सरकारनं नाराजीची लाट अंगावर घेऊ नका

मराठ्यांनी एकजूट फुटू देऊ नका. स्वाभिमानाने मरायला तयार आहे. हटायला तयार नाही. मला अटक केली तरी शांततेत आंदोलन करा. एकजुटीची ताकद आहे. सरकारने आरक्षण द्यावेच लागेल. ७-८ दिवस शांततेत राहा. काय काय सुरू आहे ते बघा. गृहमंत्री काय षडयंत्र करतोय, अंतरवालीत काय दडपण सुरू आहे हे सर्व पाहा. सगळ्यांनी ईमेल करायला सुरुवात करा. माझी शेवटची विनंती आहे. गृहमंत्री जाणुनबुजून हे करतायेत. अंतरवाली सराटीतील लोकांना अटक करणे बंद करा. रडका खेळ गृहमंत्र्यांनी खेळू नये मराठ्यांच्या सहनशीलतेचे अंत बघू नका. नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा अजून संधी गेली नाही असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं. 

मराठा समाज शांतपणे बघतोय

षडयंत्र रचणे, ट्रॅप रचणे..शांततेत आंदोलन झाले मग गुन्हे दाखल का केले? १० टक्के आरक्षण घेण्यासाठी दडपण का आणताय? मला सगेसोयरेच आरक्षण हवंय. मी शेतकऱ्याचं पोरगं आहे. लेकरं मोठं व्हायला हवं म्हणून लढतोय. मला अटक करायला मी इतकं काय केले? माझ्यावर गुन्हे दाखल करताय, तुमच्यावरही मराठे गुन्हे दाखल करणार आहेत. मराठा शांत बसला नाही. तुम्ही काय काय करताय हे बघतोय असंही जरांगे म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस