मराठा समाजातर्फे उद्या चक्काजाम, ठिय्या आंदोलन

By Admin | Updated: January 30, 2017 16:38 IST2017-01-30T16:10:52+5:302017-01-30T16:38:14+5:30

जिल्ह्यातील ३० ठिकाणी चक्काजाम, तर दुसऱ्या गटाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार

The Maratha community will be witnessing tomorrow, thiya agitation | मराठा समाजातर्फे उद्या चक्काजाम, ठिय्या आंदोलन

मराठा समाजातर्फे उद्या चक्काजाम, ठिय्या आंदोलन

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 30 - विविध न्याय मागण्यांसाठी सकल मराठा समाजातील एका गटातर्फे उद्या, मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत जिल्ह्यातील ३० ठिकाणी चक्काजाम, तर दुसऱ्या गटाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. शहरासह १२ तालुक्यांतील विविध ठिकाणी शांततेत आणि शिस्तबद्धरित्या आंदोलन करण्यात येईल. यात परीक्षार्थी, विद्यार्थी, प्रवासी, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, अत्यावश्यक सेवा यांना कोणताही अडथळा निर्माण करण्यात येणार नसल्याचे समाजाचे वसंतराव मुळीक, मारुती मोरे, दिलीप जाधव यांनी सोमवारी सांगितले.  या समाजातील दुसऱ्या गटाने मात्र चक्काजामला पाठिंबा नसल्याचे सांगत सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत दसरा चौकात ठिय्या आंदोलन करणार असल्याचं बाबा इंदुलकर, दिलीप देसाई आणि अजित राऊत यांनी सांगितले.

Web Title: The Maratha community will be witnessing tomorrow, thiya agitation