शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

१० टक्के ईबीसी आरक्षणाचा मराठा समाजाला लाभ नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 05:29 IST

सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे ज्या घटकांना कोणत्याही मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ किंवा सोईसुविधेचा फायदा दिला जात नाही. अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांचा त्यात समावेश आहे. केंद्र सरकारच्या मागास प्रवर्गांच्या यादीमध्ये मराठा समाजाचा समावेश नाही.

विशेष प्रतिनिधी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) या प्रवर्गातून आरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे या समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या (ईबीसी) १० टक्के आरक्षणाचा लाभ राज्यातील शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाच्या जागा यामध्ये घेता येणार नाही, असे राज्य शासनाने मंगळवारी स्पष्ट केले.

सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे ज्या घटकांना कोणत्याही मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ किंवा सोईसुविधेचा फायदा दिला जात नाही. अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांचा त्यात समावेश आहे. केंद्र सरकारच्या मागास प्रवर्गांच्या यादीमध्ये मराठा समाजाचा समावेश नाही. त्यामुळे केंद्र सरकारमधील नागरी सेवा व पदे यामध्ये सरळसेवा प्रवेशासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आरक्षणासाठी मराठा समाज पात्र आहे. राज्यात मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गात आरक्षण दिलेले असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र एखाद्या उमेदवाराला देण्यापूर्वी सदर उमेदवार राज्यात लागू असलेल्या सामाजिक आरक्षणात मोडतो किंवा नाही या बाबत संबंधित तहसिलदारांनी खात्री करावी. तसेच नियुक्ती प्राधिकाऱ्यांनीदेखील तशीच पडताळणी करावी. जेणेकरून पात्र उमेदवारांनाच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या प्रमाणपत्राचा लाभ घेता येईल.

दक्षता घ्यावी...केंद्रीय सेवांचा लाभ घेण्यासाठीचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र राज्य शासकीय सेवांसाठीच्या पदभरतीमध्ये वापरले जाणार नाही याचीदेखील दक्षता संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी घ्यावी, असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे....अन्यथा एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरु देणार नाहीमराठा ठोक मोर्चाचा मुख्यमंत्र्यांना इशारालोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू पावलेल्या ४२ जणांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन पूर्ण न केल्यास येत्या ९ आॅगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतल्या ‘वर्षा’ आणि ‘मातोश्री’ या निवासस्थानांसमोर धरणे धरले जाईल. एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने बुधवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.संघटनेचे प्रमुख नानासाहेब जावळे-पाटील, संजय सावंत, विजयकुमार घाडगे, महेश डोंगरे तसेच काही मृत आंदोलकांचे कुटुंबिय यावेळी उपस्थित होते. नोकºया देण्यासंदर्भातली फाईल मंत्रालयात पडून असताना त्यावर निर्णय घेण्याऐवजी पुन्हा बैठकांचे गुºहाळ लावले आहे. त्यामुळे आता बैठका-चर्चा नकोत, थेट निर्णय घ्या, अन्यथा मराठ्यांचा रोषास सामोरे जा, असा इशारा जावळे-पाटील यांनी दिला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवस्मारकालाही गती द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण