‘मेपल’ साकारणार सामान्यांचे घर!
By Admin | Updated: February 27, 2015 02:03 IST2015-02-27T02:03:09+5:302015-02-27T02:03:09+5:30
वाढती महागाई आणि आकाशाला भिडणाऱ्या घरांच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न धुसर होत असतानाच ‘मेपल समूहा’ने पुण्यात केवळ १ ला

‘मेपल’ साकारणार सामान्यांचे घर!
पुणे : वाढती महागाई आणि आकाशाला भिडणाऱ्या घरांच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न धुसर होत असतानाच ‘मेपल समूहा’ने पुण्यात केवळ १ लाखामध्ये हक्काचे घर, ही अभिनव योजना आणली आहे. या
खास योजनेसाठी ‘मेपल’ने १ मार्च
हा ‘इंडिया हौसिंग डे’ घोषित केला आहे.
या योजनेमध्ये सुरूवातीला १ लाख रुपये भरायचे आहेत. यामध्ये स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन खर्चाचाही समावेश आहे. ही रक्कम भरल्यावर ३ वर्षानंतर किंवा घर ताब्यात मिळाल्यानंतर ग्राहकांनी कर्जाचे हप्ते भरायचे आहेत. यासाठी ग्राहकांच्या वतीने ‘मेपल’ बँकेकडून कर्ज घेणार असून, पहिले ३ वर्षे किंवा घराचा ताबा ग्राहकांना देईपर्यंत ‘मेपल’ कर्जाचे हप्ते भरणार आहे.
ग्राहकांनी १ मार्चपूर्वी घर बुक केल्यास ‘मेपल समूहा’तर्फे एलईडी दिवे, मोटार सायकल, मॉड्युलर किचन अशी खास बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच एक सोडत काढण्यात येणार असून त्यामध्ये एक सदनिका जिंकण्याची संधीही ग्राहकांना मिळू शकते. याशिवाय ३ वर्षानंतर हप्ते भरण्याची सुविधा आणि ४ लाख रूपयांचा अधिक फायदा मिळणार आहे. १ मार्चनंतर घर बुक केल्यास, मात्र हे फायदे मिळणार नाहीत; लगेच घराचे हप्ते सुरू होतील आणि मुख्य म्हणजे घरांच्या किमती १ लाख रुपयांनी वाढणार आहेत.
‘मेपल समूहा’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिन अगरवाल म्हणाले, स्वस्त घरे म्हणजे, निकृष्ट स्वरूपाचे बांधकाम हा गैरसमज होऊ शकतो. ‘मेपल’ बांधकामाचे इतरांना कंत्राट देत नाही, तर स्वत:च बांधकाम करीत असल्याने ते दर्जेदार असते. शिवाय ‘मेपल’ जागा मालकांबरोबर व्यवस्थित कायदेशीर करार करून, त्यांच्याबरोबरच संयुक्तपणे प्रकल्प उभा करते. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च अतिशय कमी
होतो. त्यामुळे सर्वसामान्यांना किफायतशीर किमतीमध्ये दर्जेदार घर मिळू शकते.