शहरं
Join us  
Trending Stories
1
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना सूचना
2
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
3
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
4
US-इराण लढाईत पाकिस्तान अडकला, ३ संकटांनी घेरलं; असीम मुनीर यांनी बोलावली तातडीची बैठक
5
धुळ्यात हजारो मतदान कार्डांचा साठा सापडला; एमआयएमचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
6
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
7
बाजारात घसरण होऊनही गुंतवणूकदारांनी ३२ हजार कोटी कमावले; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
अमेरिका-इराण युद्धासाठी इस्रायल सतर्क, आयर्न डोम सक्रिय; आणखी एक युद्ध सुरू होणार?
9
अयोध्येतील श्रीराम मंदिर अन् कुतुब मिनारपेक्षा उंच! बिहारमध्ये उभारले जातेय विराट रामायण मंदिर
10
Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?
11
IND vs NZ : कोण आहे Kristian Clarke? ज्यानं 'रो-को'ला रोखून दाखवत राजकोटचं मैदान गाजवलं
12
शीख मुलीला पाकिस्तान्यांनी उचलून नेले, ६ जणांनी अनेक दिवसांपर्यंत सामूहिक बलात्कार केला
13
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
14
हृदयद्रावक! "बेटा, मी येतोय...", वडिलांचा लेकीला शेवटचा कॉल; पतंगाच्या मांजामुळे गमावला जीव
15
गुंतवणूकदारांची दिवाळी! RBI च्या निर्णयामुळे गुंतवणूकदार मालामाल; ५ वर्षांत पैसा झाला ३ पट!
16
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
17
मृत्यूची झडप! महाकाय क्रेन भरधाव 'रेल्वे गाडी'वर वर कोसळलं; २८ प्रवाशांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
18
Syeda Falak: "एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला…" फडणवीसांना चॅलेंज देणारी सईदा फलक आहे तरी कोण?
19
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
20
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसमर्पणासाठी माओवाद्यांनी मागितली १ जानेवारीची मुदत; संयम बाळगण्याची विनंती

By संजय तिपाले | Updated: November 28, 2025 18:06 IST

महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमोर नवा प्रस्ताव

गडचिरोली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी)  महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) विशेष क्षेत्रीय समितीने आत्मसमर्पणासाठी आता १ जानेवारी २०२६ ची मुदत मागितली आहे. प्रवक्ता अनंत याने यासंदर्भात २७ नोव्हेंबरला पत्रक जारी केले असून  तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ‘संयम बाळगा, आत्मसमर्पणाची संधी द्या’, अशी विनंती केली आहे.

महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत याने २४ नोव्हेंबरला आत्मसमर्पणाची तयारी दर्शवत १५ फेब्रुवारीची मुदत मागितली होती. यानंतर छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी ‘सरकारकडे अधिक वेळ नाही, माओवाद्यांनी विनाविलंब शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करावे’, असे स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान, २७ नोव्हेंबरला माओवाद्यांनी  नवे पत्रक जारी करत १ जानेवारी रोजी सर्व जण शस्त्रत्याग करुन मुख्य प्रवाहात येऊ, असे जाहीर केले आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, गृहमंत्री विजय शर्मा आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना पत्र पाठविले आहे. 

सुरक्षित वातावरणात पुनर्वसन प्रक्रिया राबवावी

अनंत याने म्हटले की, या प्रक्रियेपर्यंत तिन्ही राज्यांनी सुरक्षादलांच्या कारवाया थांबवाव्यात, कारण सुरू असलेल्या मोहिमेमुळे  विखुरलेल्या माओवादी घटकांशी संपर्क साधण्यात अडथळा निर्माण होत असल्याचा त्यांचा दावा आहे. ‘आम्ही तुकड्यात नव्हे तर मोठ्या संख्येने, संगठित रीतीने शस्त्रे सोडू इच्छितो. सरकार पुनर्वसनाची प्रक्रिया सुरक्षित वातावरणात राबवेल, अशी अपेक्षा आहे,’ असे निवेदनात नमूद करण्यात आले.

छत्तीसगड सरकारचा प्रतिसाद; महाराष्ट्र व मध्यप्रदेशकडून अद्याप प्रतीक्षा

छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी १०-१५ दिवसांत शरणागतीची प्रक्रिया शक्य असल्याचे मत व्यक्त केले होते. त्याबाबत प्रतिसाद देताना माओवादी प्रवक्त्याने ही वेळ मर्यादा अपुरी असल्याचे नमूद केले असले तरी सरकार संवादासाठी तयार असल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मात्र,महाराष्ट्र व मध्य प्रदेशकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद न आल्याचे खेदाने आम्ही नमूद करतो, असेही या निवेदनात म्हटले आहे.

‘पीएलजीए’ सप्ताह न पाळण्याचे आवाहन

प्रवक्ता अनंत याने पीएलजीए सप्ताह न साजरा करण्याचा निर्णयही पत्रकात स्पष्ट केले आहे. भावी शस्त्रसमर्पणासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संपर्कात राहावे, एकत्र निर्णय घ्यावा व व्यक्तिगत शरणागती टाळावी, असेही निर्देश देण्यात आले.  यापूर्वी शरणागती स्वीकारलेल्या सोनू उर्फ भूपती व सतीश यांनी या वाटाघाटीत मध्यस्थी करण्याची अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maoists request January deadline for surrender, urge patience.

Web Summary : Maoists' committee seeks until January 1, 2026, for surrender, requesting patience from Maharashtra, Chhattisgarh, and Madhya Pradesh CMs. They cite disrupted communication due to ongoing security operations and aim for collective surrender. Chhattisgarh shows responsiveness, but Maharashtra and Madhya Pradesh are yet to respond.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी