शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

माओवादी संबंध प्रकरणातील भारद्वाज,गोन्सालवीस व फरेरा यांचा जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 14:25 IST

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या अ‍ॅड. सुधा भारद्वाज, व्हर्नन गोन्सालवीस, अ‍ॅड. अरुण फरेरा यांचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालायने फेटाळून लावला.

ठळक मुद्देगडलिंग व सेन यांच्या अर्जावर १ नोव्हेंबरनंतर निर्णय अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग आणि प्रा. शोमा सेन यांच्या जामिनावर १ नोव्हेंबरनंतर निर्णय होणार होणार

पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या अ‍ॅड. सुधा भारद्वाज, व्हर्नन गोन्सालवीस, अ‍ॅड. अरुण फरेरा यांचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावला. तर अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग आणि प्रा. शोमा सेन यांच्या जामिनावर १ नोव्हेंबरनंतर निर्णय होणार होणार आहे. विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी तीनही आरोपींचा जामीन नाकारला. या निकालाच्या विरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती बचाव पक्षाच्या वकिलांकडून देण्यात आली. तसेच नजरकैदमध्ये एका आठवड्याची वाढ करण्यात यावी असा अर्ज देखील करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. राहुल देशमुख आणि अ‍ॅड. सिद्धार्थ पाटील यांनी दिली.जूनमध्ये अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरोधात  दोषाआरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने मुदतवाढ दिली होती. परंतु, ती मुदतवाढ बेकायदेशीर ठरवत मुंबई उच्च न्यायालयाने ती रद्द केली आहे. मात्र, महाधिक्तायांच्या विनंतीवरून या आदेशाला आठवडाभराची (१ नोव्हेबरपर्यंत) स्थगिती देण्यात आली आहे. त्यावर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. मुदतवाढीला स्थगिती मिळाल्याने जामिनासाठी अर्ज केलेल्या अ‍ॅड. गडलिंग आणि सेन यांच्या अर्जावर देखील १ नोव्हेंबरनंतर सुनावणी होणार आहे. तर भारद्वाज, गोन्सालवीस, अ‍ॅड. फरेरा यांच्या विरोधात दोषारोपत्र दाखल करण्याची मुदत अद्याप संपलेली नाही. त्यामुळे त्यांच्या जामिनावर सुनावणी घ्यावी, अशी विनंती त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर त्यावर शुक्रवारी निकाल झाला. दोषारोपपत्र दाखल करण्याची मुदतवाढ रद्द झाल्यास सुधीर ढवळे, शोमा सेन, रोना विल्सन आणि महेश राऊत यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिस