शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

...अन् एकाएकी यूट्यूबवरुन डिलीट होऊ लागले इंदुरीकर महाराजांचे व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 14:30 IST

वादग्रस्त विधानामुळे इंदुरीकर महाराज अडचणीत

मुंबई: कीर्तनकार इंदुरीकर महाराज सध्या वादात सापडले आहेत. ओझर येथील एका कीर्तनात मुला-मुलीच्या जन्मासंदर्भात इंदुरीकर महाराजांनी केलेलं विधान वादग्रस्त ठरलं आहे. यामुळे मनस्ताप सहन कराव्या लागल्या इंदुरीकर महाराजांनी यूट्यूब चॅनेल चालवणाऱ्यांना इशारा दिला. त्यामुळे इंदुरीकर महाराजांचे व्हिडीओ अपलोड करणाऱ्या अनेकांनी स्वत:हून व्हिडीओ डिलीट करण्यास सुरुवात केली आहे.इंदुरीकर महाराजांचे हजारो व्हिडीओ यूट्यूबवर आहेत. त्यांना मिळालेले व्ह्यूज लाखोंच्या घरात आहेत. इंदुरीकर महाराज कीर्तनासाठी महाराष्ट्रभर प्रवास करतात. अनेक जण त्यांच्या कीर्तनाचं चित्रिकरण करतात. त्यानंतर ते स्वत:च्या यूट्यूबवर अपलोड करुन लाखो रुपये कमावतात. व्हायरल झालेल्या याच व्हिडीओंमुळे इंदुरीकर महाराज अडचणीत आले आहेत. त्यामुळेच त्यांनी यूट्यूब चॅनेल चालवणाऱ्यांना थेट इशारा दिला. याचा धसरा घेऊन यूट्यूब अनेक चॅनेल चालवणाऱ्या अनेकांनी इंदुरीकर महाराजांचे व्हिडीओ डिलीट करण्यास सुरुवात केली. कीर्तनच्या माध्यमातून अनेक विषयांवर परखड मतं मांडणारे इंदुरीकर महाराज मुला-मुलींच्या जन्माबाबत केलेल्या विधानावरून वादात साडपले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या सर्व प्रकारामुळे इंदुरीकर महाराज उद्विग्नता व्यक्त केली. दोन तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे काही बोललो, ते चुकीचं नाहीच. त्याला अनेक ग्रंथांचा संदर्भ आहे, असा खुलासा इंदुरीकर महाराजांनी केला. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि कीर्तन सोडून शेती करेन,' अशी भावना इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केली. या वादाचं खापर इंदुरीकर महाराजांनी यू ट्युब चॅनेल आणि कॅमेरावाल्यांवर फोडलं. 'यू ट्युबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. इंदुरीकरला संपवायला निघालेत. मात्र मी कशातही सापडत नसल्यानं मला नको त्या प्रकरणात गुंतवण्याचा आटापिटा सुरू आहे. मी आता एका वेगळ्या निर्णयापर्यंत आलेलो आहे. आता लय झालं. एखाद-दुसरा दिवस जाऊ द्यायचा. फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची क्षमता संपलेली आहे,' असं म्हणत त्यांनी कीर्तनाला पूर्णविराम देण्याचे संकेत दिले. 

टॅग्स :indurikar maharajइंदुरीकर महाराजYouTubeयु ट्यूब