शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2022: स्वच्छ, टिकाऊ आहे, त्याला उभे केलं तर डिपॉझिट जाते; भ्रष्टाचारी नेत्यांबद्दल फडणवीस काय म्हणाले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 08:30 IST

Lokmat Maharashtrian of the year awards 2022: अनेकवेळा लोक आम्हाला विचारतात की, एखाद्यावर अनेक गुन्हे दाखल असूनही तुम्ही त्याला तिकीट का देता? त्यांना आम्हाला सांगावे लागते...

भ्रष्टाचार ही राजकारणालाच नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. ही संपवायची असेल तर सामूहिक प्रयत्न हवेत. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले लोक बहुमताने निवडून येतात. त्यांना लोक वारंवार निवडून पाठवतात. जोपर्यंत समाज चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणणार नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारावर मत मांडले. 

 अनेकवेळा लोक आम्हाला विचारतात की, एखाद्यावर अनेक गुन्हे दाखल असूनही तुम्ही त्याला तिकीट का देता? त्यांना आम्हाला सांगावे लागते की, ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तोच निवडून येतोय. जो स्वच्छ, टिकाऊ आहे, त्याला उभे केलं तर डिपॉझिट जाते त्याचे. केवळ राजकीय नेते बदलून काहीही होणार नाही. समाजाला बदलावे लागेल आणि केवळ समाजावर जबाबदारी टाकता येणार नाही. नेत्यांचेही परिवर्तन झाले पाहिजे. मोदीजी आल्यानंतर काही प्रमाणात हे सुरू झाले आहे. अशा लोकांसाठी कीटकनाशक तयार होतंय. तेच ही कीड हळूहळू दूर करेल, याचा मला विश्वास आहे, असे फडणवीस म्हणाले. 

फडणवीस म्हणाले, ‘तुमच्यामुळे माझ्या बोलण्यात फरक पडला’फडणवीस, तुमच्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. पहिल्यावेळी तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री झालात, त्यावेळी मी तुम्हाला आवर्जून फोन करून सांगायचो की, तुमचा भाषण करताना स्वर इतका वर नका नेऊ. आता तुम्ही पूर्ण बदललेले आहात, असे नाना म्हणाले. त्यावर लगेच फडणवीस म्हणाले, ‘नाना याचं शंभर टक्के क्रेडिट तुम्हाला जातंय. माझ्या विधानसभेच्या प्रत्येक भाषणानंतर नानांचा रात्री फोन यायचा, अरे बाबा... किती जोराने बोलतो.  जरा श्वास घेऊन बोल, शांतपणे बोल. मी त्यांना कबूल करायचो की, आता माझं पुढचं भाषण ऐका आणि भाषणाला उभं राहायचो. पुन्हा तसाच बोलायचो. नानांचा पुन्हा मला फोन यायचा... आता असं वाटतं की मी पूर्णपणे बदललो आहे. हे क्रेडिट फक्त तुमचं आहे.’

तो अधिकार फक्त अजित पवार यांनाचकुठेही श्वास न घेता बोलण्याचा अधिकार फक्त अजित पवारांना आहे, असे नानांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. गाण्यामध्ये लतादीदी व बोलण्यात अजितदादा कुठे श्वास घेतात, हेच कळत नाही. नानाच्या या विधानावर जमलेल्या काही नेत्यांमध्ये अजितदादांची तारीफ झाली का टीका यावरुन जाेरदार चर्चा सुरू झाली. 

 

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2022Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNana Patekarनाना पाटेकरEknath Shindeएकनाथ शिंदे