शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

...अनेकांना वाटत होते मी राजकारणातून निवृत्त होईन..! शरद पवार यांचा माजी मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 16:05 IST

महाराष्ट्रातील जनतेने तसे काही घडु दिले नाही...

ठळक मुद्देबारामती येथे आयोजित ''कृषिक २०२० प्रदर्शन '' उद्घाटन

बारामती :  अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या हातात पुष्पगुच्छ देत बहुदा आपण आता राजकारणातून निवृत्त व्हा, असे तर हे  दोघे मला सांगत आहे का सांगत आहेत का असेच वाटले. भाषणाच्या सुरूवातीलाच पवार यांनी आपल्या सत्कारासंदर्भात सत्काराचा मिश्कीलपणे उल्लेख करीत अशी टिप्पणी केली.तसेच अनेकांना विधानसभा निवडणुकीच्यावेळी मी राजकारणातून निवृत्त होईन असे वाटत होते पण तसे काही घडले नाही.महाराष्ट्रातील जनतेने तसे काही घडु दिले नाही,अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला.  

बारामती येथे आयोजित ''कृषिक २०२० प्रदर्शन '' उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते. त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेली राजकीय कोटी उपस्थितांमध्ये चर्चेचा चांगलाच विषय ठरली. यावेळी पवार पुढे म्हणाले, आज जागतिक स्थिती बदलली आहे. त्यातून सतत नवे कृषी संशोधन आपल्याला पाहायला मिळत आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात, माणसांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी शेतीत नवनवीन संशोधन करण्याची गरज आहे. देशात न्यायालयाने कृषी संशोधन करण्यावर बंदी घातली आहे. न्यायाधीशांचे हे काम आहे का? यावर मला भाष्य करता येणार नाही. पण त्यांनी अशा गोष्टीत लक्ष न घातलेलं बरं. काही अपायकारक होत असल्यास ते थांबवण्यास माझी मनाई नाही .मात्र, जे उपायकारक असेल ते करण्यास काही हरकत नाही. आजच्या कार्यक्रमाला राज्याचे कृषिमंत्री उपस्थित आहेत. त्यांनी प्रदर्शनातील प्रात्यक्षिके अभ्यासून राज्यातील इतर भागांमध्ये याचा फायदा कसा करता येईल, यासंबंधी विचार करण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.———————————

टॅग्स :BaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे