कदमसह राष्ट्रवादीचे अनेक नेते घोटाळ्यात
By Admin | Updated: July 27, 2015 01:01 IST2015-07-27T01:01:22+5:302015-07-27T01:01:22+5:30
अण्णा भाऊ साठे महामंडळातील विविध खरेदीमध्ये सुमारे ३८५ कोटींचा घोटाळा प्राथमिक चौकशीतून पुढे आला आहे. येत्या बुधवारी याप्रकरणाचा

कदमसह राष्ट्रवादीचे अनेक नेते घोटाळ्यात
पुणे : अण्णा भाऊ साठे महामंडळातील विविध खरेदीमध्ये सुमारे ३८५ कोटींचा घोटाळा प्राथमिक चौकशीतून पुढे आला आहे. येत्या बुधवारी याप्रकरणाचा सविस्तर अहवाल विधीमंडळासमोर ठेवला जाणार आहे. त्यावेळी आमदार रमेश कदम यांच्यासोबत राष्ट्रवादीतील अनेक मोठे नेते त्यात सहभागी असल्याचे उजेडात येईल, असा दावा समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना रविवारी केला.
पुणे शहरातील नागरिकांसाठी कांबळे यांनी रविवारी जनता दरबार घेतला होता. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. या घोटाळ््यातील मुख्य सूत्रधार राष्ट्रवादीचे आमदार कदम फरार आहेत. सीआयडी त्यांचा शोध घेत असून, त्याविषयी हायअलर्ट देण्यात आला आहे, असे दिलीप कांबळे म्हणाले. या प्रकरणात महामंडळातील १६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तत्कालीन अनेक राजकीय नेत्यांचा घोटाळ््याशी संबंध आहे. त्यामधील सर्वच राष्ट्रवादीचे असल्याचा संशय आहे. त्याविषयीचा चौकशी अहवाल विधिमंडळात जाहीर झाल्यानंतर मोठे नेतेही अडचणी येणार आहेत, असे कांबळे म्हणाले.