शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

"मोठा धक्का बसेल अन् आश्चर्य होईल असे पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट लवकरच होतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 14:10 IST

आमच्याकडे धुसफूस नाही तर मविआकडे धुसफूस आहे असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळेंनी केला.

मुंबई - भाजपा येण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार, खासदार बरेच इच्छुक आहेत. महाविकास आघाडीतील पक्षात पुढच्या काळात खिंडार पडणार नाही. २०२४ मध्ये लोकसभा, विधानसभा लढवण्यासाठीही मविआकडे उमेदवार शिल्लक राहणार नाही. प्राथमिक पातळीवर अनेकांशी चर्चा सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकारच्या विकासकामावर जनतेचा विश्वास बसत आहे. भारत जोडो यात्रेवेळीच १५०० काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. आगामी काळात प्रवेशाचे बॉम्बस्फोट होणार आहे. अनेकांना धक्के बसतील. जनताही आश्चर्यचकीत होईल असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीबाबत भाजपा-शिंदे यांच्यात नाराजी नाही. प्रत्येक ठिकाणी दोन्ही पक्षाचे नेते एकत्रित निर्णय घेत आहेत. नागपूरचा उमेदवार ठाकरे गटाला दिल्याने मविआत भांडणे सुरू आहे. ठाकरेंना उमेदवारी दिल्यावर काँग्रेस नेत्यांनी बैठक घेण्याचं कारण काय? आमच्याकडे भांडणे नाहीत. कोकणाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर मी आणि उदय सामंत यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. आमच्याकडे धुसफूस नाही तर मविआकडे धुसफूस आहे असं त्यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरेंनाच स्वपक्षातील लोकच सोडून जातातउद्धव ठाकरेंचे पक्षप्रमुखपद राहते की जाते हे निवडणूक आयोगाच्या कक्षेत आहे तेच होईल. मुंबईला उद्धव ठाकरेंनी पाण्यात बुडवले. मुंबईसाठी शिंदे-फडणवीस सरकारने काही विकासकामे आणली आहे. त्याचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होईल. शिवसेना संपवण्यासाठी मोदींना मुंबईत येण्याची गरज नाही. आम्ही छोटे कार्यकर्तेच पुरेसे आहोत. त्यांच्याकडील राहिलेले आमदार, खासदारच पुढील काळात आमच्याकडे येतील. संजय राऊतांमुळे अनेक आमच्याकडे येतील आणि काही शिंदेंकडे जातील. संजय राऊतच शिवसेना संपवण्यासाठी पुरेसे आहेत. उद्धव ठाकरेंचे आमदारच स्वत:ला सांभाळायला येत नाही ते मित्रपक्षांना कसे सांभाळतील. पक्षाचे लोक तुम्हाला सोडून जातात दुसरे तुमच्याकडे का येतील? असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला आहे. 

उद्धव ठाकरेंना जमत नाहीउद्धव ठाकरे केवळ निवडणुकीपुरतं जवळ येतील आणि त्यानंतर दूर जातील हे प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत. स्वार्थासाठी उद्धव ठाकरे  काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित आलेत. भाजपा-शिंदे गट आणि अजून कुणी पक्ष आमच्यासोबत येतील त्यांना योग्यप्रकारे न्याय देणे, सन्मान देणे हे एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना जमते. ते उद्धव ठाकरेंना जमत नाही. ते कधीच युतीला न्याय देऊ शकत नाहीत असं बावनकुळे यांनी सांगितले. 

वाचाळवीर कोण हे महाराष्ट्राला माहितीवाचाळवीर कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही हे अजितदादांना सभागृहात बोलणे शोभतं का? ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते हे मान्य आहे मग धर्मवीर नव्हते हे का म्हटलं? तुम्ही अपमान करतायेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवाचे हाल झाले पण कधीही त्यांनी धर्मासाठी तडजोड केली नाही. धर्मवीर नाही याला भाजपाला आक्षेप नाही. भाजपाने कधी महापुरुषांचा अपमान केला नाही. महापुरुषांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी. संस्कृती जपणे ही आमची जबाबदारी आहे असं बावनकुळेंनी म्हटलं. 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाcongressकाँग्रेस