शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

फास्टॅगचा फास आवळण्यास सुरुवात; टोलनाक्यांवर मिळणाऱ्या सवलती होणार बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 20:15 IST

सवलती हव्या असतील तर वाहनाला फास्टॅग लावावाच लागणार...

ठळक मुद्देदेशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर फास्टॅगच्या माध्यमातून टोल भरणे बंधनकारक सध्या फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी या महामार्गांवर एक किंवा दोन लेन दररोज २ ते अडीच हजार वाहने मासिक पासमधून मिळणाऱ्या सवलती घेतात

पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) फास्टॅगचा वापर वाढविण्यासाठी फास आवळण्यास सुरूवात केली आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनांना यापुढे टोलनाक्यांवर मिळणारी रिटर्न टोलमधील सवलत, मासिक पास, स्थानिक नागरिकांना मिळणाऱ्या सवलती बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे सवलती हव्या असतील तर वाहनाला फास्टॅग लावावाच लागणार आहे. देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर फास्टॅगच्या माध्यमातून टोल भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सध्या फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी या महामार्गांवर एक किंवा दोन लेन ठेवण्यात आल्या आहेत. सुरूवातीला दि. १ डिसेंबरपासूनच फास्टॅगची सक्ती केली जाणार होती. पण फास्टॅगच्या अनुपलब्धतेमुळे ही मुदत दि. १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतर पुन्हा महिनाभरासाठी वाहनचालकांना दिलासा देण्यात आला आहे. मात्र, आता दि.१५ जानेवारीपासून महामार्गांवर फास्टॅगची सक्ती करण्यास सुरूवात झाली आहे. तसेच ‘एनएचएआय’कडून फास्टॅगचा वापर वाढविण्यासाठी सवलतीही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक सर्व टोल व्यवस्थानाकडे पोहचले असून पुढील एक-दोन दिवसांत त्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार असल्याची माहिती पुणे-सातारा महामार्ग टोल व्यवस्थापनाकडून देण्यात आली.सध्या टोलनाक्यांवर परतीच्या प्रवासासाठी एका बाजूच्या टोलमधून कारसाठी जवळपास ५० टक्के सवलत दिली जाते. खेड-शिवापुर टोलनाक्यावरून साताराच्या दिशेने जाण्यासाठी ९५ रुपये टोल आहे. परतीच्या प्रवासाचा (रिटर्न) टोल दिल्यास १४० रुपये लागतात. याचाअर्थ वाहनचालकांना ५० रुपयांची सवलत दिली जाते. टोलनाक्यापासून २० किलोमीटर अंतरातील स्थानिक वाहनांना २६५ रुपयांता महिनाभर कितीही वेळा टोलनाक्यावरून ये-जा करता येते. तसेच इतर वाहनचालकांना मासिक पाससाठी ३ हजार व ६ हजार रुपये असे दोन पर्याय आहेत. या शुल्कामध्ये टोलनाक्यावरून अनुक्रमे ५० व १०० वेळा ये-जा करता येते. दररोज २ ते अडीच हजार वाहने मासिक पासमधून मिळणाऱ्या सवलती घेतात. तर रिटर्न टोल भरणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे, असे टोल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. -----------------------

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गfour wheelerफोर व्हीलरtollplazaटोलनाकाGovernmentसरकार