शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

युती झाल्यानं उमेदवार जोशात; पण बंडखोरीच्या चिंतेमुळे उद्धव ठाकरे पेचात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 13:15 IST

एका जागेसाठी अनेक जण इच्छुक असल्यानं मातोश्रीसमोर पेचप्रसंग

मुंबई: शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केल्यानंतर पक्षाच्या काही खासदारांनी चिंता व्यक्त केली होती. पक्ष स्वबळावर लढल्यास जागा राखणं कठीण असल्याचं जवळपास 10 खासदारांनी ठाकरे यांना सांगितलं. यानंतर युती झाली. त्यामुळे खासदारांचा जीव भांड्यात पडला. मात्र आता त्यांच्यासमोर एक नवीच समस्या निर्माण झाली आहे. यामुळे उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे. सध्या लोकसभेत शिवसेनेचे 18 खासदार आहेत. यापैकी 10 खासदारांनी उद्धव ठाकरेंकडे युतीसाठी हट्ट धरला होता. युती झाल्यानंतर शिवसेनेचे बरेचसे खासदार निर्धास्त झाले होते. मात्र आता या खासदारांना वेगळीच चिंता सतावते आहे. औरंगाबाद आणि नाशिकमधील शिवसेनेच्या खासदारांपुढे पक्षाच्याच जिल्हाप्रमुखांचं आव्हान आहे. चंद्रकांत खैरे औरंगाबादचे खासदार आहेत. या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आग्रही आहेत. तर नाशिकमध्येदेखील खासदार हेमंत गोडसे यांच्यासमोर जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचं आव्हान आहे. यवतमाळ आणि रायगड मतदारसंघदेखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोकेदुखी ठरण्याची दाट शक्यता आहे. भावना गवळी यवतमाळच्या विद्यमान खासदार आहेत. खैरे आणि गोडसे यांच्याप्रमाणे गवळी यांच्यासमोर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचं आव्हान नाही. मात्र या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड उत्सुक आहेत. रायगडमध्ये खासदार अनंत गीते यांना उमेदवारी दिल्यास कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे. केंद्रात मंत्री झाल्यानंतर गीते मतदारसंघात फिरकलेच नाहीत. त्यामुळे गीते यांच्यासाठी मतं मागायची कशी, असा सवाल कार्यकर्ते विचारत आहेत. त्यामुळे शिवसेना नेतृत्त्वासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. विद्यमान खासदारांना संधी दिल्यास जिल्हाप्रमुख किंवा शिवसेनेचे मंत्री त्यांना सहकार्य करण्याची शक्यता कमीच आहे. विद्यमान खासदारांचं तिकीट कापून इतरांना संधी दिल्यास त्या उमेदवाराला खासदार मदत करणार का, हादेखील प्रश्नच आहे. त्यामुळे आता कोणाला उमेदवारी द्यायची, असा प्रश्न मातोश्रीसमोर आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBhavna Gavliभावना गवळीHemant Godseहेमंत गोडसेAnant Geeteअनंत गीते