विठ्ठल मंदिरात उद्यापासून महिला पुजा-यांचा मंत्रोच्चार
By Admin | Updated: July 31, 2014 04:01 IST2014-07-31T04:01:16+5:302014-07-31T04:01:16+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातील बडवे-उत्पात पायउतार झाल्यानंतर सरकारी पुजाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.

विठ्ठल मंदिरात उद्यापासून महिला पुजा-यांचा मंत्रोच्चार
जगन्नाथ हुक्केरी, पंढरपूर
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातील बडवे-उत्पात पायउतार झाल्यानंतर सरकारी पुजाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. दहा पुजाऱ्यांपैकी दोन महिला आहे. सर्व पुजारी १ आॅगस्टला रूजू होणार आहेत. त्यांना मंत्रोच्चार, विधी, पूजा, अलंकार व नित्योपचाराचे धडे मंदिर समितीने दिले आहेत.
मंदिर समितीने शास्त्रोक्त पद्धतीने पूजा व विधी करण्यासाठी पुजाऱ्यांसाठी अर्ज मागवून मुलाखती घेतल्या. यात महिलांची संख्या लक्षणिय म्हणजे २३ इतकी होती. त्यातील १६ महिलांनी मुलाखत दिली. दोन महिलांची रूक्मिणी मातेच्या पुजेसाठी निवड झाली.
भक्ती मार्गावरील पर्यटक निवासामध्ये उत्सवमूर्ती ठेवण्यात आली असून, तेथे पूजा, विधी, नित्योपचार, अलंकार, आभूषणे घालणे, पोशाख करणे, नैवेद्य दाखविणे, मूर्तीला विश्रांती देताना घ्यावयाची काळजी, मळवट भरणे, शेजारती, तुळशी पूजा, पाद्यपूजा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.