पराभवाचे मुंबईत मंथन
By Admin | Updated: May 23, 2014 00:11 IST2014-05-22T23:42:28+5:302014-05-23T00:11:30+5:30
बुथ कमिट्यांच्या नियोजनाचा अभाव; योजना लोकांपर्यंत न पोहोचणे भोवले

पराभवाचे मुंबईत मंथन
अकोला: लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर गुरुवारी मुंबई येथे पार पडलेल्या समीक्षा बैठकीत प्राथमिक स्तरावर चिंतन करण्यात आले. बुथ कमिट्यांच्या नियोजनाचा अभाव आणि सरकारच्या योजना लोकांपर्यंत न पोहोचल्याने पराभव झाल्याचा निष्कर्ष बैठकीत काढण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र बैठकीत पराभवाचे सखोल विश्लेषण करण्यात आले नसून, लवकरच प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ात बैठक घेण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ातील कॉँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी, पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून स्वत:चे दामटलेले घोडे, नियोजनाचा अभाव आदींमुळे लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा पराभव झाला. कॉँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल हे दुसर्या क्रमांकावर राहिले. भाजपचे उमेदवार खा. संजय धोत्रे हे २ लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले. या पराभवाचे विश्लेषण करून वर्षअखेर होणार्या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी मुंबईत गुरुवारी पक्ष कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाला जनतेने का नाकारले, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्र आणि राज्य शासनाने सर्वच स्तरातील आणि प्रत्येक समाज घटकासाठी योजना तयार केल्या. नागरिकांचे जीवनमान उंचवावे, यासाठी कायदेही केले. मात्र हे निर्णय आणि योजना जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत. तसेच या योजना लोकाभिमुख आहेत, हेही नागरिकांना पटवून देण्यात नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अपयश आले. जिल्ात बुथ कमिट्यांचे नियोजन करण्यास विलंब झाला. सर्वच पदाधिकारी आणि नेत्यांनी विजयासाठी सांघिक प्रयत्न केले नाहीत. या सर्व कारणांमुळे पक्षाचा पराभव झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. समीक्षा बैठकीत जिल्ातील पदाधिकार्यांनी सूचनाही केल्या. बैठक प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
बैेठकीला अकोल्यातून जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, माजी आ. लक्ष्मणराव तायडे, सुधाकरराव गणगणे, नातिकोद्दिन खतीब, महानगराध्यक्ष मदन भरगड, बबनराव चौधरी, वाशिमचे दिलीप सरनाईक, डॉ. झिशान हुसेन, बद्रुजमा, आ. अमित झनक, नगरसेवक साजिद खान पठाण, प्रकाश तायडे, डॉ. सुभाषचंद्र कोरपे आदी उपस्थित होते.
** विधानसभेसाठी तयारीला लागण्याच्या सूचना....
यंदा होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना प्रदेश पातळीवरून देण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टीने जिल्ातील रखडलेले प्रकल्प, योजना व प्रश्नांचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. यामध्ये विमानतळ विस्तारीकरण, एलबीटीचा समावेश राहणार आहे. हे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.