मनोरुग्णाने बहिणीची हत्या करुन स्वतःलाही संपवलं
By Admin | Updated: March 23, 2017 15:38 IST2017-03-23T15:38:00+5:302017-03-23T15:38:16+5:30
साता-यात एका मनोरुग्ण महिलेने धारदार शस्त्राने वार करुन बहिणीची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

मनोरुग्णाने बहिणीची हत्या करुन स्वतःलाही संपवलं
>ऑनलाईन लोकमत
वाई (सातारा), दि. 23 - मनोरुग्ण महिलेने धारदार शस्त्राने वार करुन बहिणीची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत त्यांचे वडीलही जखमी झाले आहेत. वाई तालुक्यातील एकसरमधील ही घटना आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
सीमा गायकवाडने (वय 35 वर्ष) केलेल्या हल्ल्यात हेमा कळंबे (वय 36 वर्षे)यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडली त्यावेळी केवळ घरात सीमा आणि हेमा दोघीच होत्या. यावेळी सीमाने हेमावर धारदार शस्त्राने हल्ला केला. काही वेळाने त्यांचे वडील अरविंद कळंबे घरात दाखल होताच त्यांच्यावरही सीमानं हल्ला केला. पण त्यांनी स्वतःची सुटका करुन घराबाहेर पळ काढला.
मदतीसाठी ग्रामस्थांनो बोलवून आणेपर्यंत सीमाने स्वतःला संपवले होते. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.