लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या दिलीप खेडकर यांचा जामीन अर्ज बेलापूर न्यायालयाने फेटाळला आहे. या गुन्ह्यात बाउन्सर प्रफुल्ल साळुंखे हा अटकेत असून, दिलीप खेडकर यांचा शोध रबाळे पोलिसांची विविध पथके घेत आहेत.
ऐरोली येथे झालेल्या अपघातात कारची नुकसानभरपाई मागण्यासाठी ट्रक क्लीनरचे अपहरण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर, बाउन्सर प्रफुल्ल साळुंखे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल असून, त्यांना सहकार्य केल्याप्रकरणी मनोरम खेडकर यांना त्यात सहआरोपी करण्यात आले आहे.
पोलिस त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न करत असतानाच मनोरमा खेडकर यांना बेलापूर न्यायालयाने १३ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन दिला. यानंतर वकिलामार्फत दिलीप खेडकर यांच्या जामिनासाठी बेलापूर न्यायालयात अर्ज करण्यात आला. मात्र, त्यांना जामीन मिळू नये, यासाठी पोलिसांनी गुन्ह्याची गंभीरता सोमवारी न्यायालयापुढे मांडली होती. या प्रकरणी बुधवारी सुनावणीत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.
Web Summary : Dilip Khadkar's bail plea was rejected in a kidnapping case. Manorama Khadkar received interim bail until October 13th. The case involves the kidnapping of a truck cleaner over accident compensation, implicating Dilip Khadkar and others. Police continue searching for Dilip Khadkar.
Web Summary : दिलीप खेडकर की जमानत याचिका अपहरण मामले में खारिज कर दी गई। मनोरमा खेडकर को 13 अक्टूबर तक अंतरिम जमानत मिली। मामला दुर्घटना मुआवजे को लेकर एक ट्रक क्लीनर के अपहरण से जुड़ा है, जिसमें दिलीप खेडकर और अन्य शामिल हैं। पुलिस दिलीप खेडकर की तलाश जारी रखे हुए है।