शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

२० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार, मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 17:15 IST

मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये इशारा सभेचे आयोजन करण्यात आले होते.

बीड : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये सभा झाली. यावेळी राज्य सरकारला इशारा देत मराठ्यांचे पुढचे आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.

मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये इशारा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार झोपेचं सोंग घेत आहे. मराठा समाजाचा अपमान करत आहे. मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. मराठा समाजाच्या जीवावर सत्ता मिळवतात आणि सत्ता मिळाल्यावर छगन भुजबळ यांच्या सारख्यांना त्याचा लाभ दिला जात आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

राज्य सरकारला इशारा देत मराठ्यांचे पुढचे आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे. २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावी, सरकारला खूप वेळ दिला. मुंबईत जाताना कुणी हिंसा करु नये. ३ कोटी मराठे मुंबईत येणार आहेत. जो हिंसा करेल तो आपला नाही. फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यावी, मुंबईला जाण्याची जोरदार तयारी करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

कुणी गाडी पेटवली तर त्याला आपणच पकडून द्यायचं. कुणाला जाळपोळ करु द्यायची नाही. आम्हाला मुंबईला यायची हौस नाही, पण आता आमच्या लेकरांना न्याय हवा आहे. २० तारखेच्या आत आरक्षण देता आलं तर बघा. मी मेलो तरी चालेल मागे फिरणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. देशातील मोठी जात संपवण्याचा तुमचा घाट दिसतो. एकदा जर मोठा समुदाय खवळला तर तुमचा सुपडा साफ होईल. तुमचं राजकीय अस्तित्व साफ होईल. माझ्या मराठ्यांना डिवचू नका, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, आमच्यावर डाव टाकू नये. आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. सामंजस्याने ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याचं (छगन भुजबळ) ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर येणारं आंदोलन तुम्हाला जड जाईल. हा फक्त बीड जिल्हा आहे. अजून महाराष्ट्र बाकी आहे. जिल्ह्याला जिल्हे आणि घराला घर बाहेर पडणार आहे, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणBeedबीड