शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात मुंबईला निघणार; पोलिसांचा बंदोबस्त तैनात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 09:04 IST

जालन्यामध्ये पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त तैनात केला आहे. अंतरवाली सराटीमधून निघण्यापूर्वी जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत.

मराठा आरक्षणासाठी आंदोलक आज अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे जाण्यासाठी निघणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम असून त्यांनी आरक्षण जाहीर झाले तरी आम्ही मुंबईला जाणारच अशी भूमिका घेतली होती. 

मनोज जरांगे पाटील सकाळी ९ वाजता अंतरवाली सराटी येथून निघणार आहेत. मराठवाड्यातील विविध भागातील शेकडो वाहने आणि युवक अंतरवालीत दाखल झाले आहेत. यामुळे वाहतूकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. 

जालन्यामध्ये पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त तैनात केला आहे. अंतरवाली सराटीमधून निघण्यापूर्वी जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये ते तिथूनच आमरण उपोषण सुरु करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

 होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, शीघ्र कृती दलाचे जवान असे सुमारे दीड हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त रस्त्यात ठिकठिकाणी लावण्यात आला आहे. जरांगे पाटलांचा मुंबई दौरा शांततेत पार पडावा, या दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून ठिकठिकाणी पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. शिवाय ड्रोन,  सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर या पायी पद यात्रेवर राहणार आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण