शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा ‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणा घुमणार? मनोज जरांगे पाटील यांनी दिला आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 21:03 IST

Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणावरून सरकारमधील काहींची पोटदुखी असू शकते. मात्र गोरगरीबांचा अवमान सहन केला जाणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil News: मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी अद्यापही प्रमाणपत्रांचे अपेक्षित पद्धतीने वाटप होत नसल्याबाबत पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. अधिवेशनानंतर ठोस निर्णय झाला नाही, तर पुन्हा आंदोलन उभे करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला असल्याचे म्हटले जात आहे. 

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली. कॅबिनेटमध्ये हा विषय घेतो, असे आश्वासन दिले आहे. एकनाथ शिंदे आणि विखे पाटील यांनी मराठवाड्यातील सर्व मराठे कुणबी असल्याचे मान्य करून गॅझेटनुसार आरक्षण देऊ असे म्हटले होते. मात्र अर्ज देऊनही प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी जाणूनबुजून दिली जात नाही, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. 

शिंदे समितीला मुदतवाढ देऊनही नोंदी का सापडत नाहीत?

अधिवेशनानंतर प्रमाणपत्र वाटपाचा निर्णय झाला नाही तर आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागेल. त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल. शिंदे समितीला मुदतवाढ देऊनही नोंदी का सापडत नाहीत? याचे उत्तर द्यावे; अन्यथा आंदोलन अपरिहार्य होईल. मराठा आरक्षणावरून सरकारमधील काहींची पोटदुखी असू शकते. मात्र गोरगरीबांचा अवमान सहन केला जाणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, रक्ताने हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल? भाजपमध्ये गेले तरी भाजप का मंत्रीपद देईल? संतोष देशमुख यांना अजून न्याय नाही. फक्त मंत्रिपद द्यायचे म्हटले होते तर अजितदादांचा पक्ष एवढा ट्रोल झाला. त्यामुळे मंत्रिपद दिले तर पक्ष संपेल. रक्ताने हात भरलेल्या लोकांवर कधीच बोलायचे नाही यामुळे माझा दिवस चांगला जात नाही. आम्ही पूर्ण माहिती घेत आहोत. धनंजय मुंडे यांनी आमच्या नादी लागू नये. मी जर मागे लागलो तर माझ्याजवळ २२ पेक्षा अधिक प्रकरण आलेली आहेत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना दिला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Maratha Quota Stir: Manoj Jarange Patil Warns of Fresh Agitation

Web Summary : Manoj Jarange Patil threatens renewed Maratha quota protests if demands aren't met post-session. He criticizes delayed certificate issuance, questions committee progress, and warns of political repercussions. He also cautioned Dhananjay Munde.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण