शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

“छगन भुजबळ नमुना हे ओबीसींना माहिती, आधीच राजीनामा द्यायचा होता”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 17:49 IST

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली आहे.

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेनंतर मराठा समाजाने जल्लोष केला. तर दुसरीकडे ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. ओबीसी नेते आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रायगडावर जाऊन मनोज जरांगे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर घणाघाती टीका केली.

मीडियाशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले केली, रायगडावर आल्यानंतर विजय प्राप्त होतो. ७० वर्षांनी मराठ्यांसाठी कायदा बनला आहे. ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत, त्या मराठ्यांसाठी सगेसोयरे म्हणून हा कायदा पारित झालेला आहे. महाराष्ट्रातील एकही मराठा आरक्षणापासून तसेच ओबीसीत जाण्यापासून वंचित राहणार नाही. हा खूप मोठा कायदा आहे. यावर काही हरकती मागवण्यात आल्या आहेत. मात्र, हे आरक्षण टिकवणे केवळ राज्य सरकारच्या हातात आहे. ते त्यांनी टिकवले पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

मनोज जरांगे यांना छगन भुजबळ यांच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांचा एकेरी उल्लेख करत बोचरी टीका केली. काहीच करता आले नाही, म्हणून राजीनामा देता का, आधीच राजीनामा द्यायचा होता. ओबीसी बांधवांवर उपकार करता का, ओबीसी बांधव वेडे नाहीत. तुम्ही राजकारणी आहात,  नमुना आहात, हे सर्वजण ओळखून आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये वाद निर्माण केला जात आहे. तुम्हाला काय करायचे ते करा. सरकार यांना घाबरत नाही, पायाखाली तुडवतात, या शब्दांत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. 

दरम्यान, सरकार तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कुणाच्या बाजूने नसतात. ते सत्याच्या बाजूने असतात. मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना उभे राहावेच लागणार आहे. अन्यथा ते मराठ्यांच्या नजरेतून पडतील. एक जण खोटे बोलत असल्यामुळे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यावर डाग येऊ लागला आहे. सगेसोयरे याचा कायदा केला आहे, त्याची अंमलबजावणी त्यांनाच करावी लागणार आहे, त्याशिवाय सुट्टी नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळ