शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

“अजय महाराज बारस्कर हा भोंदू, आंदोलन संपवण्याचा डाव, सरकारचा ट्रॅप”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 18:55 IST

Manoj Jarange Patil News: तुकाराम महाराजांच्या आडून समाजाचे वाटोळे करू नका. हा सरकारचा ट्रॅप असून अजय महाराज बारस्कर हा भोंदू महाराज आहे, असा पलटवार मनोज जरांगेंनी केला.

Manoj Jarange Patil News: राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर केलं असलं तरी जोपर्यंत कुणबी नोंदींबाबत काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मात्र, अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले.

मनोज जरांगे पाटील हे सरकारकडे एकही निवेदन देत नाही. मनोज जरांगे पाटील हे  रोज पलटी मारतात. सातत्याने भूमिका बदलतात आणि नेहमी खोटे बोलतात. मनोज जरांगे पाटील यांनी २३ डिसेंबर रोजी पहिली गुप्त मिटिंग कन्हैया हॉटेलमध्ये घेतली. त्या मिटिंगचा साक्षीदार आहे. तिथे जरांगे पाटील आतमध्ये एक बोलले आणि बाहेर कॅमेऱ्यासमोर जाऊन दुसरेच बोलले. मी योग्यवेळी ते जाहीर करीन, असा इशारा अजय महाराज बारस्कर यांनी दिला. या टीकेचा मनोज जरांगे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.

अजय महाराज बारस्कर यांची माफी मागणार नाही

अजय महाराज बारस्कर यांची माफी मागणार नाही. मला पाणी पाजून त्याला मोठे व्हायचे होते. तुकाराम महाराजांच्या आडून समाजाचे वाटोळे करू नका. अजय महाराज बारस्कर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज आहे. आंदोलन संपवण्याचा घाट आहे. या बाबाला उत्तरे देणार नाही, काय बोंबलायचे ते बोंबल, अन्यथा याला वेगळे वळण लागू शकते, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. तसेच एक ट्रॅप झाला असून त्यावेळी त्याला जागा मिळाली नाही  हा दुसरा ट्रॅप असून प्रत्येकवेळी कोणीतरी घुसवण्याचा डाव आहे. या दोन चार जणांना आंदोलनात काही मिळवायच होते, ते मिळाले नसेल. त्यांना ट्रॅप करायचा होता. त्यात शिंदे यांचा आणि त्याचा एक माणूस होता. शिंदे यांचा प्रवक्ता आहे. तो मला बदनाम करण्याचा सरकारचा ट्रॅप होता, असे जरांगे म्हणाले.

दरम्यान, २४ फेब्रवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता आपआपल्या गावात रास्तारोको आंदोलन सुरू करायचे. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा, असे निवेदन पोलीस आणि महसूल प्रशासनाला निवेदन द्यायचे. अधिकाऱ्यांच्याच हातात हे निवेदन द्यायचे. २५ फेब्रुवारीलाही असाच रास्तारोको करून अधिकाऱ्यांना निवेदन द्यायचे. जोपर्यंत सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत रोज असे आंदोलन करायचे. सरकारने २४ ते २९ फेब्रुवारीपर्यंत सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाजातील सर्व वृद्ध व्यक्तींनीही आमरण उपोषण करायचे. यातील एकाच्याही जीवाला बरे-वाईट झाले तर जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण