शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 11:41 IST

Manoj Jarange Patil: उमेदवार उभे करण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय आहे. कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून द्यायचे हे समाज योग्यरित्या ठरवेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या पक्षाच्या चिन्हा शिवाय दुसऱ्या कोणत्याही चिन्हाचा प्रचार कधीही केला नव्हता. परंतु महाराष्ट्रातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे. ८८ जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मतदान एका टप्प्यात आहे. मात्र महाराष्ट्रात ४८ जागा असताना पाच टप्प्यात मतदान घेऊन ठिकठिकाणी स्वतः पंतप्रधान व गृहमंत्री अमित शहा यांना सभा घ्याव्या लागत आहेत. हा सत्ताधाऱ्यांचा पराभव असून मराठा एकजुटीचा विजय आहे, अशी टीका मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

मीडियाशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला कुणाला पाडा किंवा कुणाला विजयी करा, असे सांगितले नाही. ज्याला पाडायचे त्याला असे पाडा की त्याला मराठा समाजाची ताकद दिसली पाहिजे असे म्हटल आहे. मराठा समाजाने पाडायचे शिकले पाहिजे, असे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीनंतर सगेसोयरे कायदेशीर अंमलबजावणी न केल्यास यापेक्षाही बिकट परिस्थितीचा सामना सत्ताधाऱ्यांना करावा लागेल. मराठा समाजाने एक महिन्यापूर्वीच विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदींवर आली आहे

आव्हान तर त्यांच्यापुढे उभे राहिले आहे. उमेदवार उभे करण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय आहे. स्वतःची मुले आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेऊन मराठा समाजाने यावेळेस ताकदीने काम करायचे आहे. एक गोष्ट खरी आहे, मोदींना महाराष्ट्रात इतक्या सभा घेण्याची कधी गरज पडली नाही. मी म्हटले होते की, मराठ्यांना खेटू नका. तीच चूक त्यांचे स्थानिक नेते करत आहेत. माझ्या गोरगरीब मराठा लेकरांवर गुन्हे दखल केले. काहीही नसताना गुन्हे दखल करण्यात आले. आरक्षण असून दिल नाही. ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदींवर आली आहे, या शब्दांत मनोज जरांगे यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. कोण येत आणि कोण जाते हे माझ्या दृष्टीने महत्वाचे नाही. पाहिल्यासारखे मराठे आता राहिले नाही. आता फायदा घेऊ देत नाहीत. मी घेऊ देत नाही तर मराठे कसे घेऊ देतील. कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून द्यायचे हे समाज योग्यरित्या ठरवेल, असे मनोज जरांगे म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा