शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सुनील कावळेंचे बलिदान वाया जाणार नाही, मरेपर्यंत समाजाशी गद्दरी करणार नाही: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 14:47 IST

Maratha Reservation Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या शब्दापुढे जात नाही. मराठा समाज माझा मायबाप आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

Maratha Reservation Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आता अधिक आक्रमकपणे लढा दिल्याचे दिसत आहे. या लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील राज्यभरात दौरे करत आहेत. मुंबईनंतर आता मनोज जरांगे राजगुरूनगर येथे पोहोचले. त्यांनी मराठा समाजाला संबोधित केले. यावेळी, सुनील कावळे यांचे बलिदान वाया जाणार नाही. कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा एल्गार मनोज जरांगे यांनी केला. 

सरकारने स्थापन केलेली समिती नेमके काय करते, अशी विचारणा करत, आत्महत्या करू नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. तसेच ही संधी पुन्हा मराठा समाजाला मिळणार नाही. २४ तारखेनंतर असे आंदोलन केले जाईल की, सरकारला झेपणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. घराघरात जाऊन मराठा आरक्षणाविषयी माहिती द्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही एकच मागणी आमची आहे. विशेष अधिवेशन घेऊन कायदा पारित करा, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मराठ्यांशी गद्दारी करायची नाही. मी मरेपर्यंत मराठा समाजांशी गद्दरी करणार नाही. माझ्या जातीला न्याय देण्यासाठी मी उभा आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या वेदना सहन होत नाही

मराठा समाजातील एका बांधवाने काल आत्महत्या केली. मराठा समाजावर दु:खाचा डोंगर कोसळला. मराठा समाज कावळेंचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्याच्या लेकराला मराठा समाज कधीच माया कमी पडू देणार नाही. कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही. मला मराठा समाजाच्या वेदना सहन होत नाही.  मी हार, तुरे स्विकारण्यासाठी नाही तर मराठ्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गावागावात फिरत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. आत्महत्यांना सरकार जबाबादार आहे. सरकारने आरक्षण दिले असते तर आत्महत्या  झाल्या नसत्या, अशी घणाघाती टीका मनोज जरांगे यांनी केली. 

दरम्यान, मराठ्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे. हे शांतता युद्ध आहे. ठोकल्याशिवाय आंदोलन मिळत नाही, अशी एकेकाळी मराठा समाजाची भावना होती, पण आता शांततेच आरक्षण मिळवणार असा शब्द आहे. मी मराठा समाजाच्या शब्दापुढे जात नाही. मराठा समाज माझा मायबाप आहे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राज्यातला मराठा एक झाला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण