शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

मनोज जरांगे पाटील बोलताना ढसाढसा रडले; सरकारला दिला आणखी एक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 10:54 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू केले आहे.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू केले आहे. सरकारला दिलेला वेळ आता संपत आला असून जरांगे पाटील मुंबईत आंदोलनसाठी जाणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम असून त्यांनी आरक्षण जाहीर झाले तरी आम्ही मुंबईला जाणारच अशी भूमिका घेतली होती. दरम्यान, आज मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी येथून मुंबईसाठी निघणार आहेत.या आधी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते मराठा आरक्षणाबाबत बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. 

मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात मुंबईला निघणार; पोलिसांचा बंदोबस्त तैनात 

"माझ मराठ्यांना शेवटच सांगणे आहे मी तुमच्यात असेल नसेल मला माहित नाही, मराठ्यांची एकजुट फुटू द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटायचे नाही. आपल्या मुलांना संपवण्याचा घाट का घातला आहे. आपली मुल संपली पाहिजेत अस त्यांना वाटत आहे, आमचं आंदोलन हे सहज घेत आहेत. आमच्या नोंदी सापडूनही हे आरक्षण देत नाहीत, असं जरांगे पाटील म्हणाले. यावेळी जरांगे पाटील भावूक झाले होते. 

"मी समाजाला न्याय दिला पाहिजे, समाजात असेन नसेन याचे मला दु:ख होत आहे.मी समाज सुद्धा बघायला पाहिजे. या उपोषणामुळे मला शरीर जास्त साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची आहे. म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं आहे मराठ्यांची  मुल मोठी व्हावीत म्हणून मुंबईकडे निघालो आहे. मी तुमच्यात असेल नसेल हा विचार संपवू द्यायचा नाही. हे आंदोलन बंद पडू द्यायचे नाही, आथा आरक्षण घेऊन मुलांचे डोक्यावर गुलाल टाकायचा आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढणार आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.  

मुंबईपर्यंत पायी चालत जाणार 

अंतरवाली सराटीतून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत पायी चालत जाणार असल्याचं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केल आहे. मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना सरकार इतकं निर्दयी कसं असू शकत? शेकडो माता माऊल्यांच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं आणि हे सरकार उघड्या डोळ्यांनी बघत आहे. त्यामुळे मी रात्रीपासून व्यथीत झालो अस म्हणत जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले. आपले लेकरं मेले आहेत. आता ते आपल्यात नाहीत. मात्र, त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंआहे. त्यामुळं मी आता अंतरवालीतूनचं आमरण उपोषण करत पायी मुंबईकडे चालत जाणार आहे, असं जरांगे पाटलांनी म्हंटल आहे. या मोर्चादरम्यानही राज्य सरकारशी चर्चेचे दरवाजे खुले राहणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण