शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

देशाच्या विरुद्ध बोलणा-यांना धडा शिकवू - मनोहर पर्रीकर

By admin | Updated: July 30, 2016 16:28 IST

सैन्य प्राणांची बाजी लावत असताना भारतमातेच्या विरोधात अपमानास्पद भाष्य करणा-यांना धडा शिकविला जाईल, असा इशारा संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला

ऑनलाइन लोकमत -  
पुणे, दि. 30 - भारतीय सैन्य कोणत्या परिस्थितीत सीमेवर लढा देते, याची सर्वांनी जाणीव ठेवण्याची गरज आहे. सैन्य प्राणांची बाजी लावत असताना भारतमातेच्या विरोधात कोणालाही कोणतेही अपमानास्पद भाष्य करण्याचा अधिकार नाही. असे भाष्य करणा-यांना धडा शिकविला जाईल, असा इशारा संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला. 
 
पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि भारतशक्ती डॉट इन यांच्या वतीने नितीन गोखले लिखित ‘सियाचिन : धगधगते हिमकुंड’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी पर्रिकर बोलत होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ‘सियाचिन : धगधगते हिमकुंड’ या पुस्तकावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. वायुदलाचे माजी उपाध्यक्ष ए. एम. भूषण गोखले, सियाचिन विषयक तज्ज्ञ लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी, प्रसिद्ध लेखक व संरक्षण विश्लेषक नितीन गोखले आदी मान्यवर यामध्ये सहभागी झाले होते. 
 
'भारतीय सैन्य अत्यंत सक्षम, संवेदनशील आणि शक्तिशाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा हेच अंतरिम ध्येय डोळयासमोर ठेवून सैन्य देशासाठी प्राणपणाने लढते. आपले सैन्य क्रूरपणे कोणत्याही भागात घुसखोरी करुन विनाकारण हल्ला चढवत नाही. भारतीय सैन्याचीही काही तत्वे आहेत आणि ती काटेकोरपणे पाळली जातात. सोशल मिडियाच्या माध्यमातून सैन्याबाबत गैरसमज पसरवणारे व्हिडिओ व्हायरल होतात. अशा बनावट व्हिडिओंवर विश्वास न ठेवता सर्वसामान्य नागरिकांनी त्यांचा आदर करायला हवा. सैन्य बळकट आहेच; त्यांना नागरिकांचाही पाठिंबा मिळणेही महत्वाचे आहे. देशभक्ती हे आपले परम कर्तव्य आहे. या गुणांचे बाळकडून घरातूनच मिळत असते. आर्थिक सत्ता आणि सक्षम, बळकट सैन्य असेल तर देशासमोरील सर्व समस्या सुटू शकतात. त्यामुळेच देशावर कोणतेही संकट आल्यास सैन्य हातावर हात धरुन बसणार नाही. देशाच्या रक्षणासाठी आवश्यक असलेले सर्व अधिकार भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. सरकारही सुरक्षेसंदर्भात आक्रमकपणे मात्र संयमी भूमिका मांडत आहे', असं मनोहर पर्रीकर बोलले आहेत.
 
‘संकटातून संधी शोधणे आणि युध्दाचा अंत ही आपली उद्दिष्टे असायला हवीत. १९६२ च्या युध्दातील काही चुकांमुळे मोठे प्रश्न निर्माण झाले. १९६५ मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी भारतीय सैन्य, सरकार आणि राजकीय पक्ष यांच्यात समन्वय घडवून आणला आणि त्याचा फायदा देशाला झाला. १९७१ च्या युध्दात सीमा निश्चित न झाल्याने सियाचिनचा प्रश्न उभा राहिला. सियाचिन ही भारताची अमूल्य संपत्ती आहे आणि ती इतर कोणाच्याही हाती सोपवली जाणार नाही’ असं भूषण गोखले यांनी म्हटलं आहे. 
 
‘पाकिस्तान आणि चीनला हातमिळवणी करता येऊ नये, यासाठी सियाचीनवर तळ ठोकून राहणे अत्यंत गरजेचे आहे. सियाचिन पाकिस्तानला देऊन टाका, असे म्हणणारे लोक देशद्रोही आहेत. भारतीय सैन्याच्या पराकष्ठेमुळे हा भाग अद्याप भारताच्या ताब्यात आहे', असं नितीन गोखले बोलले आहेत. 
 
संजय कुलकर्णी म्हणाले, ‘१९८४ मध्ये सियाचिन मोहिमेमध्ये मला सहभागी होता आले. तेथील परिस्थिती अत्यंत विदारक असताना भारतीय सैन्याने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. ’ 
आमीर खानला टोला -
वर्तमानपत्रातील बातम्या वाचून माझी पत्नी किरणला देश सोडून जावेसे वाटते, असे विधान अभिनेता आमीर खानने केल्यानंतर बराच वादंग निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पर्रीकर म्हणाले, ‘आपले घर छोटे असले तरी ते आपलेसे वाटते. स्वत:च्या घराची आपल्याला लाज वाटता कामा नये. त्यामुळे देशाबाबत केलेले हे विधान अत्यंत चुकीचे आहे. देशभक्तीसारखे गुण आपण घरातूनच शिकले पाहिजेत. अशा विधानांनी समाजात चुकीचा संदेश जातो.