मनमोहन सिंह यांना अक्कल नव्हती, हंसराज अहिरांची जीभ घसरली
By Admin | Updated: February 20, 2017 09:05 IST2017-02-20T09:05:35+5:302017-02-20T09:05:35+5:30
मागील काँग्रेसचे सरकार हे बेकार होते. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना अक्कल नव्हती अशा शब्दांत हंसराज अहिर यांनी टीका केली आहे

मनमोहन सिंह यांना अक्कल नव्हती, हंसराज अहिरांची जीभ घसरली
>ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 20 - केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर काँग्रेस सरकारवर टीका करताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर घसरले आहेत. 'मागील काँग्रेसचे सरकार हे बेकार होते. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना अक्कल नव्हती', अशा शब्दांत हंसराज अहिर यांनी टीका केली आहे. वर्ध्यातील मोरांगणा येथे दुसऱ्या टप्प्यातील जिल्हापरिषद निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते.
काँग्रेसच्या काळात गावातील रोजगार पूर्णपणे बंद झाले. बेकार सरकार होतं, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना अक्कल नव्हती अशी टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केली. हंसराज अहिर यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.