मनमाडला दोन कोटी रुपयांच्या नोटा हस्तगत

By Admin | Updated: June 25, 2017 01:45 IST2017-06-25T01:45:57+5:302017-06-25T01:45:57+5:30

येथील मालेगाव चौफुलीवर शहर पोलिसांच्या गस्ती पथकाने सुमारे दोन कोटी रुपयांच्या नोटा हस्तगत करून, पुण्यातील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

Manmad got two crore worth of notes | मनमाडला दोन कोटी रुपयांच्या नोटा हस्तगत

मनमाडला दोन कोटी रुपयांच्या नोटा हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड (जि. नाशिक) : येथील मालेगाव चौफुलीवर शहर पोलिसांच्या गस्ती पथकाने सुमारे दोन कोटी रुपयांच्या नोटा हस्तगत करून, पुण्यातील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी चौकशी करीत आहेत.
मनमाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. एच. शेख यांचे पथक गस्त घालत होते. मालेगाव-पुणे महामार्गावरून जाणाऱ्या इनोव्हा गाडीची त्यांनी तपासणी केली.
गाडीमध्ये एक कोटी ९८ लाख रुपयांच्या नोटांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. महादेव मार्कंडे व मोहन शेलार (रा. पुणे) यांनी नोटांबाबत माहिती न दिल्याने, पोलिसांनी त्या हस्तगत करून दोघांना ताब्यात घेतले.
संबंधित नोटा पुणे येथील एका प्रथितयश बिल्डरच्या असून, मालेगाव येथील व्यवहार फिसकटल्याने सदर व्यक्ती नोटांसह परत जात असल्याचे बोलले जाते.

Web Title: Manmad got two crore worth of notes