फेसबुकद्वारे तिने घडविले जन्मदात्यांचे 30 वर्षानंतर मनोमीलन !

By Admin | Updated: November 23, 2014 02:52 IST2014-11-23T02:52:29+5:302014-11-23T02:52:29+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल 30 वर्षानंतर त्यांच्या मुलीनेच थेट ऑस्ट्रेलियातून दोघांचे मीलन घडवून आणले आणि दोघे पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकल़े

Manilalan after 30 years of births! | फेसबुकद्वारे तिने घडविले जन्मदात्यांचे 30 वर्षानंतर मनोमीलन !

फेसबुकद्वारे तिने घडविले जन्मदात्यांचे 30 वर्षानंतर मनोमीलन !

योगेश गुंड - अहमदनगर
प्रेमविवाह केल्यानंतर पत्नीशी किरकोळ कारणावरून वाद झाल़े त्याचा राग धरीत त्याने चक्क मुंबई सोडून नगर गाठले. त्याला 30 वर्षे लोटली. दोघांनीही एकमेकांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते पुन्हा भेटू शकले नाहीत़ मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल 30 वर्षानंतर त्यांच्या मुलीनेच थेट ऑस्ट्रेलियातून दोघांचे मीलन घडवून आणले आणि दोघे पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकल़े 
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही वास्तव कथा नगरमध्ये घडली आहे. गोपालकृष्णा कुडपुडी हे मूळचे आंध्र प्रदेशातील काकीनाडा गावचे. बीएस्सीच्या दुस:या वर्षाला असतानाच कुटुंबीयांनी त्यांचा विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र हे मान्य नसल्याने त्यांनी घर सोडून कोलकाता गाठले. तेथे पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी सुरू केली. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याने त्यांना बढती मिळाली़ तेथून नाशिकला आल्यानंतर ग्रीन हॉटेलमध्ये बारमन म्हणून नोकरी केली. हॉटेल मालकाने त्यांना मुंबईत हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले. नंतर मुंबईतील बांद्रा हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी पत्करली. याच काळात फाल्गुनी नावाच्या तरुणीची आणि त्यांची ओळख झाली़ त्यातून त्यांचे प्रेम फुलल़े पण फाल्गुनीच्या कुटुंबीयांना हा विवाह मान्य नव्हता. म्हणून दोघांनी नाशिकमध्ये नोंदणी पद्धतीने विवाह करून ते मुंबईत वास्तव्यास आले. विवाहानंतर त्यांना सपनादेवी हे कन्यारत्न झाल़े सर्वकाही सुरळीत असतानाच दोघांमध्ये अचानक वाद सुरू झाल़े वाद विकोपाला गेल्याने कायदेशीर विभक्त न होता 3क् वर्षापूर्वी गोपालकृष्णा यांनी पत्नीला मुंबईतच सोडत नगर गाठले होते. सध्या ते नगरच्या हॉटेल यश पॅलेसमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहेत़ मात्र या काळात त्यांची व त्यांच्या कुटुंबाची कधीच गाठभेट झाली नाही. यंदा दिवाळीत गोपालकृष्णा यांनी स्मार्ट फोन घेऊन फेसबुक अकाउंट उघडले. त्यांना फेसबुकवर अनोळखी महिलेचे मॅसेज येऊ लागले. त्यांच्याबद्दल माहिती विचारली जाऊ लागली. चर्चेनंतर गोपालकृष्णा यांना ती आपली मुलगी सपनादेवी असल्याचे कळल़े तेव्हा दोघांच्याही डोळ्यांत आनंदाआश्रू तरळल़े ऑस्ट्रेलिया येथे वास्तव्यास असलेल्या सपनाने आईवडिलांचे मीलन घडवून आणण्याचा निर्धार केला.
 
पुन्हा एकदा अडकले विवाहाच्या बंधनात 
च्दोघांनीही पुन्हा विवाह न केल्याने त्यांना मोठा आनंद झाला. पुन्हा त्यांनी एकत्र येण्याचे ठरवले. फाल्गुनीबाई नगरला येऊन पतीला भेटल्या. 
च्दोघांनीही शिर्डीला जाऊन साई समाधीचे दर्शन घेत यापुढे एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि ते पुन्हा एकदा विवाहाच्या बंधनात अडकल़े
 
सपना या ऑस्ट्रेलिया येथे वास्तव्यास मुलीने वडील गोपालकृष्णा यांचा पत्ता व मोबाइल क्रमांक मिळवून मुंबईत आईला पाठवला़ तब्बल 3क् वर्षानंतर या दाम्पत्याचे फोनवर बोलणो झाले आणि दोघे एकत्र आले. 

 

Web Title: Manilalan after 30 years of births!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.