‘माणिकराव ठाकरें’मुळे काँग्रेसचे नुकसान!
By Admin | Updated: October 12, 2014 02:48 IST2014-10-12T02:48:03+5:302014-10-12T02:48:03+5:30
माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक पक्षाचे नुकसान करीत असल्याचा आरोप माजी आमदार बबनराव चौधरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
‘माणिकराव ठाकरें’मुळे काँग्रेसचे नुकसान!
>अकोला : विधानसभा निवडणुकीत चुकीच्या पद्धतीने तिकीट वाटप करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक पक्षाचे नुकसान करीत असल्याचा आरोप माजी आमदार बबनराव चौधरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
निवड मंडळाने निवडलेल्या उमेदवारांच्या नावांमध्ये काही नेत्यांनी हस्तक्षेप करून नवीन नावे टाकली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एकाकी पाडून चुकीच्या पद्धतीने तिकिटांचे वाटप करण्यात आले. त्यासाठी माणिकराव ठाकरे आणि मुकुल वासनिक हे दोन्ही नेते जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांना ताबडतोब पदावरून दूर करण्याची मागणी करण्यात आल्याचे चौधरी यांनी सांगितले. याबाबत माणिकराव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही, तर वासनिक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)