माणगाव पंचायत समितीच्या इमारतीचे आज उद्घाटन

By Admin | Updated: April 29, 2016 03:56 IST2016-04-29T03:56:36+5:302016-04-29T03:56:36+5:30

माणगाव पंचायत समितीची नवीन इमारत २ कोटी ६७ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आली आहे.

Mangaon Panchayat Samiti building today inaugurated | माणगाव पंचायत समितीच्या इमारतीचे आज उद्घाटन

माणगाव पंचायत समितीच्या इमारतीचे आज उद्घाटन

माणगाव : माणगाव पंचायत समितीची नवीन इमारत २ कोटी ६७ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आली आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन शुक्रवार, २९ एप्रिल रोजी राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण, महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते दुपारी १.०० वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आमदार सुनील तटकरे असतील.
जुनी इमारत राष्ट्रीय महामार्गालगत बाजारपेठेत आहे. तहसील कार्यालय या इमारतीपासून लांब असल्याने सर्वसामान्य माणूस या कार्यालयात कामासाठी आल्यास येणे - जेणे लांब पडते. त्यामुळे नागरिकांचे हाल होतात. (वार्ताहर)

Web Title: Mangaon Panchayat Samiti building today inaugurated