आंबेगावात पाण्यासाठी हंडा मोर्चा
By Admin | Updated: July 20, 2016 00:52 IST2016-07-20T00:52:56+5:302016-07-20T00:52:56+5:30
महापालिकेने अधिकृत नळजोड द्यावेत, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने आंबेगाव बुद्रुक स. नं. १५ व १६मध्ये हंडा मोर्चा काढण्यात आला.

आंबेगावात पाण्यासाठी हंडा मोर्चा
आंबेगाव बुद्रुक : महापालिकेने अधिकृत नळजोड द्यावेत, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने आंबेगाव बुद्रुक स. नं. १५ व १६मध्ये हंडा मोर्चा काढण्यात आला. यात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच, चिंतामणी शाळेपासून कात्रज बायपास जोडणाऱ्या रस्त्याचे काम त्वरित करावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. या समस्यांचे निवेदन भाजपा नेते संदीप बेलदरे यांनी आंबेगाव बुद्रुकचे ग्रामविकास अधिकारी अशोक उदागे यांना दिले.
आंबेगाव बुद्रुक स. नं. १६ मधील साई सिद्धी चौक ते चिंतामणी ज्ञानपीठपर्यंत हा हंडा मोर्चा काढला.
या वेळी विलास तापकीर, डॉ. संजय यादव, सुधीर निवंगुणे, श्रीरंग भगत, बाजीराव कोरटकर यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. येथील पाणीप्रश्न महापालिकेशी निगडित असल्याने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना भेटणार असल्याचे या वेळी बेलदरे म्हणाले.