मंडल अधिकारी घेणार पावसाची नोंद
By Admin | Updated: June 8, 2016 02:15 IST2016-06-08T02:15:03+5:302016-06-08T02:15:03+5:30
जून महिना उजाडताच महसूल विभागाच्या मंडल अधिकारी व तलाठीवर्गाला पर्जन्यमानाची नोंदी करण्याचे रजिस्टर अपडेट करावे लागते

मंडल अधिकारी घेणार पावसाची नोंद
पेण : मान्सूनच्या आगमनाची ७ जून ही तारीख गृहीत धरून जून महिना उजाडताच महसूल विभागाच्या मंडल अधिकारी व तलाठीवर्गाला पर्जन्यमानाची नोंदी करण्याचे रजिस्टर अपडेट करावे लागते. मात्र ७ जून उजाडून देखील मान्सून हजर न झाल्याने १ जूनपासून पावसाच्या घेण्यात येणाऱ्या नोंदीचे रजिस्टर कोरेच राहिले आहे. तरीही मान्सूनची जोशात होणारी एण्ट्री लक्षात घेवून रायगड जिल्ह्यातील ६० महसूल मंडल कार्यालयात पर्जन्यमान अचूकतेने नोंदी करण्याचे आदेशच कृषी आयुक्त, राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्रामार्फत महसूल विभागाला देण्यात आले आहेत. प्रत्येक मंडल, विभागीय क्षेत्रातील पर्जन्यमापके बसवून ती अपडेट करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.
आयुक्त कृषी विभाग व राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्र यांच्यामार्फत पर्जन्यमापन करण्याचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. राज्यभरातील महसूल विभागाच्या सर्व मंडलामध्ये पडलेल्या पावसाची नोंद ेंँं१ं्रल्ल.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर टाकण्यात येणार असून याद्वारे सबंध जगाच्या पाठीवर याद्वारे भारतीय माणसाला आपल्या राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात व जन्मगावी किती पाऊस पडला याची अपडेट माहिती मिळणार आहे. या मान्सून कालावधीत मंडल अधिकारी व तलाठी यांनी दैनंदिन पडणारा पाऊस व त्याच्या नोंदी कशा कराव्यात आणि घेतलेली नोंद एसएमएसद्वारे आयुक्त कृषी व राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्राकडे कशी पाठवायची याचे प्रशिक्षणही संबंधितांना देण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वा. अशा २४ तासांच्या कालावधीत पडलेला पाऊस, किती मि.मी. पडला अशी नोंद मंडल अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. दरवर्षी १ जूनपासून हा अहवाल महसूल विभाग घेत असतो. वर्षभराच्या कालावधीतील पावसाची नोंद महत्त्वपूर्ण ठरते. दैनंदिन पावसाची नोंद व हवामानशास्त्र अंदाज यावरून मान्सून आपत्तीपूर्व सुरक्षा प्रतिबंध उपाययोजना करता येतात. यामुळे आपत्तीजनक नैसर्गिक घटनांवर वेळीच मार्गदर्शन व उपाययोजना करणे शासनास शक्य होणार आहे. (वार्ताहर)
>१० मंडल कार्यालयांमार्फत पर्जन्यमान नोंद
पेण शहरासह १० मंडल कार्यालयामार्फत पर्जन्यमान नोंदले जाते. मात्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची आजपर्यंतची चोख कामगिरी, तहसील, पंचायत समिती, नगरपरिषद यांच्याबरोबरीने ६३ ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या सहकार्यामुळे पेणमध्ये आपत्ती काळात सर्वच यंत्रणा सचेत राहतात, ही समाधानाची बाब आहे.
आपत्ती प्रसंगी होणार मदत : रायगडात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस धोकादायक पडतो. ४०० ते ६०० मि.मी. दरम्यान पाऊस पडला तर पूरसदृश परिस्थिती उद्भवून नद्यांची प्रवाह पातळी धोकादायक बनते. अशा वेळेस या माहिती प्रसारण संदेशवहन यंत्रणामुळे नागरिकांना अचूक माहिती मिळण्यास ही यंत्रणा कार्यक्षम ठरते. पेण शहरासह ग्रामीण परिसराला भोगावती, बाळगंगा व पाताळगंगा या तीन नद्यांच्या प्रवाहाचा धोका आहे. त्याचबरोबर आंबेघर, शहापाडा, हेटवणे या तीन धरणांचा पूर परिस्थितीत सांडव्याद्वारे विसर्ग होणारे पाणी या बाबीमुळे तत्काळ पूरपरिस्थिती उद्भवते.
उपाय योजना करणे शक्य होणार : माहिती प्रसारण युगाच्या काळात या पर्जन्यमापक यंत्र व एसएमएस प्रणालीकडे राज्यात कुठेही किती पाऊस होईल, त्या संबंधीचे रेड अलर्ट व प्रसंगानुरुप उद्भवणारी आपत्तीजनक नैसर्गिक घटनांवर वेळीच मार्गदर्शन व उपाययोजना करणे शासनास शक्य होणार आहे. त्यामुळे अपत्तीच्या काळात नागरिकांना याचा उपयोग निश्चित होणार असून शेतकऱ्यांनाही पाऊसाचा अंदाज मिळणार आहे.