शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तुम्हीच एखाद्याला उभं करायचं अन्...; संजय राऊतांचा CM एकनाथ शिंदेंवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 12:44 IST

नरेंद्र मोदींवरही आम्ही पंतप्रधान म्हणून टीका करतो. व्यक्तिगत टीका केली नाही असंही संजय राऊतांनी सांगितले. 

मुंबई - Sanjay Raut on Eknath Shinde ( Marathi News ) मर्यादेच्या बाहेर गेले की करेक्ट कार्यक्रम कुणाचा होतो हे जसं राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, तसं जनतासुद्धा मर्यादेबाहेर गेलेल्या लोकांचा कार्यक्रम २०२४ च्या निवडणुकीत करणार आहे. या राज्यात सगळ्याच गोष्टी मर्यादेच्या बाहेर गेल्या आहेत. तुम्हीच एखाद्याला उभं करायचे आणि मर्यादेबाहेर गेल्यावर करेक्ट कार्यक्रमाची भाषा करायची. पण आम्हाला या सर्व विषयांत पडायचं नाही. महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केलेत. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ बिघडता कामा नये. पुरोगामी महाराष्ट्राला गालबोट लागू नये. महाराष्ट्रात भाषा बिघडलेली आहे त्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यावर राज्याची भाषा आणि संस्कृती पूर्णपणे बिघडायला सुरुवात झाली. जी भाषा जरांगे पाटील यांनी गृहमंत्री फडणवीसांबाबत वापरली त्याचे कुणीही समर्थन करणार नाही पण भाजपाचे काही भाडोत्री लोक विरोधी पक्षातील नेत्यांबाबत ज्या भाषेचा प्रयोग करतात त्याचे समर्थन फडणवीस आणि करेक्ट कार्यक्रम करणारे करणार आहेत का असा सवालही त्यांनी विचारला. 

तसेच तुम्ही हवी ती भाषा वापरायची आणि तुमच्यावर कुणी अशा भाषा वापरली तर तुम्हाला ती टोचते. नारायण राणे आणि त्यांची मुले कुठली भाषा वापरतात? भाजपा आणि शिंदे गँगचे काही लोक कुठल्या प्रकारची भाषा वापरतात, आज मराठी भाषा दिनानिमित्त त्यांनी आत्मचिंतन करावे. त्यातून मराठी भाषा शुद्ध होईल. टीका आम्हीही करतो, प्रखर करतो, आम्ही व्यक्तिगत टीका करत नाही. राजकीय भूमिकांवर टीका करतो. नरेंद्र मोदींवरही आम्ही पंतप्रधान म्हणून टीका करतो. व्यक्तिगत टीका केली नाही असंही संजय राऊतांनी सांगितले. 

दरम्यान, राज्य कायद्याचे आहे. सरकारवर वाटत असेल एखाद्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन होतंय तर सरकारला कारवाईचा अधिकार आहे. पण ही वेळ महाराष्ट्रावर कुणी आणि का आणली? याची चौकशी केली पाहिजे. आजही मराठा समाजाला आपली फसवणूक झालीय असं का वाटते? त्यातून हा उद्रेक सुरू असेल, गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात जातीजातीत आग लावण्याचं काम कुणी केले, हे राज्य आधी कधी असं नव्हते. हे भाजपाचे राजकारण आहे. महाराष्ट्रात जातीजातीत, पोटजातीत इतका कधीच दुभंगला नव्हता अशी टीकाही संजय राऊतांनी भाजपावर केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण