मनाली- लेह- श्रीनगर रस्ता सायकलवरुन पूर्ण

By Admin | Updated: September 4, 2015 22:36 IST2015-09-04T22:36:13+5:302015-09-04T22:36:13+5:30

नेहमीच्या धकाधकीच्या जीवनापासून काही दिवस का होईना आपली सुटका करुन घेण्यासाठी त्याने निसर्ग भ्रमंतीची ही अनोखी आणि जोखमीची सायकल मोहीम आखली

Manali-Leh-Srinagar road full of bicycles | मनाली- लेह- श्रीनगर रस्ता सायकलवरुन पूर्ण

मनाली- लेह- श्रीनगर रस्ता सायकलवरुन पूर्ण

महादेव भिसे -- आंबोली   --जिथे जाणं हेच लोकांसाठी धाडसाचं काम आहे. जिथे रस्ता हा फक्त दिशा दाखवायचं काम करतो, जिथे रस्त्यावर डांबर नावाचा प्रकार मुळीच नाही, जिथे मोटारसायकल चालवायची म्हटली तर चालक आणि मोटारसायकल या दोघांची कसोटी लागते, जिथे श्वास घ्यायचा म्हटला तर आॅक्सिजन अपुरा पडतो, जिथे स्वत:ला काही झालं तर डोंगर आणि रस्ता यांची साथ सोडली तर दुसरं कुणीच नाही. अशा प्रदेशामध्ये एका युवकाने चक्क सायकलवरुन प्रवास केला आहे. जगातील सर्वात उंच व तेवढाच अवघड समजला जाणारा मनाली - लेह - श्रीनगर रस्ता एकट्याने सायकलवरुन पूर्ण करण्याचे धाडस केले आहे आंबोलीतील २४ वर्षीय युवक अभिषेक नार्वेकर याने. अभिषेक नार्वेकर हा मुळचा आंबोलीचा परंतु, गेली तीन वर्षे तो कामानिमित्त पुणे येथे राहतो. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनापासून काही दिवस का होईना आपली सुटका करुन घेण्यासाठी त्याने निसर्ग भ्रमंतीची ही अनोखी आणि जोखमीची सायकल मोहीम आखली. अभिषेक एक स्वप्न म्हणून या मोहिमेकडे बघत होता.
या संपूर्ण सायकलींग टूरमध्ये अभिषेकने जवळपास १००० कि. मी.हून अधिक अंतर सायकलने पूर्ण केले. हा प्रवास पूर्ण करायला त्याला २३ दिवस लागले. त्यात १७ दिवस त्याने प्रत्यक्षात रस्त्यावर सायकल चालविली. यामध्ये बाईकींगसाठी जगातील सगळ्यात उंच समजल्या जाणाऱ्या पास (खारदुग्ला) चाही समावेश आहे. अभिषेकला या टूरसंदर्भात एकंदरीत आलेला अनुभव त्याने रोमांचकरित्या कथन केला. तो म्हणाला की, हे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद खूप मोठा होता. परंतु, त्यासाठीची मेहनतही तितकीच मोठी होती. वेळ, काम आणि सराव या तिन्हींचा ताळमेळ घालणे ही मोठी परीक्षा होती. मोहिमेस जाण्यापूर्वी सलग दोन महिने सिंहगड पायथ्यापर्यंत रोजचा सायकल प्रवासाचा सराव चालू होता. अभिषेकच्या या मोहिमेस मुंबईतील सायकलपटू सचिन गावकर यांनी रस्ता, थांबे, भोजनाच्या व्यवस्था याबद्दल माहिती दिली. मनाली ते लेह रस्ता आणि लेह ते श्रीनगर रस्ता या रस्त्यांवर सायकलिंगचा अनुभव रोमांचकारी व धाडसाचा होता, असे तो म्हणाला.

Web Title: Manali-Leh-Srinagar road full of bicycles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.