शिर्डीला निघालेल्या पदयात्रींना कारने उडवले, एक ठार, ४ जखमी
By Admin | Updated: December 16, 2015 09:04 IST2015-12-16T08:52:26+5:302015-12-16T09:04:31+5:30
पायी शिर्डीला निघालेल्या पदयात्रींना भिवंडीजवळ भरधाव वेगात जाणा-या स्विफ्ट कारने उडवले.

शिर्डीला निघालेल्या पदयात्रींना कारने उडवले, एक ठार, ४ जखमी
ऑनलाइन लोकमत
भिवंडी, दि. १६ - पायी शिर्डीला निघालेल्या पदयात्रींना भिवंडीजवळ भरधाव वेगात जाणा-या स्विफ्ट कारने उडवले. या अपघातात सुधीर कलप (२३) या तरुणाचा मृत्यू झाला तर, ४ पदयात्री गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईतील मालाड येथील कुरार भागातील ओम साई ग्रुपच्या साई पालखीमधून हे पदयात्री शिर्डीला जात होते.
भिवंडी तालुक्यातील कुकसे भोईप पाडा गावातून पदयात्री जात असताना भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने पदयात्रींना उडवले. सुधीर कलम या तरुणाचा मोठया प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला. अन्य चार जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पडघा पोलिस स्थानकाच्या हद्दीत हा अपघात झाला. अपघातानंतर कारचा चालक गाडी तिथेच सोडून पसार झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.